testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

नियमित सेक्सने वीर्यात ताकद!

लंडन (वृत्तसंस्था)| वेबदुनिया|
नुकतंच लग्न झालं असेल आणि मुलांचे 'प्लॅनिंग' करत असाल तर जरा या बातमीकडे नीट लक्ष द्या. प्लॅनिंग करतानाही नियमितपणे मात्र करत जा. कारण नियमित सेक्स करण्यामुळे आणि त्याची मजबूती वाढते, असे एका अभ्यासातून पुढे आले आहे.
ऑस्ट्रेलियन डॉक्टरांनी कमजोर असणार्‍या ११८ रूग्णांच्या अभ्यासानंतर हा निष्कर्ष काढला आहे. या सगळ्यांना नियमित सेक्स करायला लावण्यात आला. त्यामुळे त्यांच्या वीर्यातील कमजोर डिएनएंची संख्या कमी झाल्याचे लक्षात आले. सात दिवस नियमित सेक्स करणार्‍या या रूग्णांपैकी ८१ टक्के रूग्णांत वीर्यातील कमकुवतपणा बारा टक्क्यांनी कमी झाला होता. वीर्य मजबूत असेल तर गर्भधारणेची शक्यता वाढते.

टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान उर्फ इन व्हिट्रो फर्टिलायझेशनच्या ट्रिटमेंटपूर्वी सेक्स करू नये असा सल्ला देण्यात येतो. याचे कारण वीर्यवृद्धी (स्पर्म काऊंट) वाढावा हेच असते. वीर्य मजबूत होण्याची इतरही काही कारणे आहेत. धुम्रपान न करणे, दारू न पिणे, व्यायाम करणे यामुळेही वीर्याची ताकद वाढते.

या अभ्यासगटाचे प्रमुख डॉ. डेव्हिड ग्रीनिंग यांनी या अभ्यासाचे सार सांगताना, युवा जोडप्यांना नियमितपणे सेक्स करण्याचा सल्ला दिला. यामुळे मध्यमवयीन मंडळींना काळजी वाटू शकते, पण युवा जोडपी निश्चिततच आनंदतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नियमितपणे सेक्स केल्याने वीर्य मजबूत कसे होते? याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे, की वीर्य जास्त काळ शरीरात राहिल्याने कमकुवत होण्याची शक्यता असते. सेक्स केल्याने ते बाहेर पडते. अर्थात, विनापत्य जोडप्यांना हा उपाय अवलंबल्याने मूल होतेच, असे मात्र नाही, याकडेही काही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

या आठ मार्गाने करा थकवा दूर करा

national news
सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल आणि कोणतेही काम करायची इच्छा होत नसेल तर या टिप्स ...

Sun Tanning: सन टॅनिंग दूर करण्यासाठी घरगुती फेस पॅक

national news
हळद-बेसन 2 चमचे बेसन, चिमूटभर हळद, 1 चमचा गुलाबपाणी, 1 चमचा दूध एका बाऊलमध्ये मिसळून ...

वेट लॉसमध्ये देखील इफेक्टिव आहे हे मसाले

national news
रोजच्या जेवणात वापर करण्यात येणारे काही मसाले जेवणाची चव वाढवतात तसेच वजन कमी करण्यास ...

बनाना विथ स्पाँज केक आइसक्रीम

national news
दह्याला चांगल्या प्रकारे घुसळून घ्यावे व त्यात कुस्करलेलं केळ टाकावे. सायीला फेटून ...

जाणून घ्या बर्फाचे हे ही फायदे...

national news
उन्हाळ्यात बर्फ नाव घेतलं तरी थंड वाटू लागतं परंतू गार रसदार बर्फाचे अनेक फायदे आहे जे ...