मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 5 जानेवारी 2017 (15:18 IST)

स्पर्धेच्या निमित्ताने वैद्यकशास्त्राचे विद्यार्थी मधुमेह सुलभ करून सांगणार

मधुमेहाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी ´गाडगे मधुमेह केंद्रा´तर्फे विशेष स्पर्धा;
 
१ लाखाहून अधिक पारितोषिके जिकंण्याची संधी 
 
इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशनतर्फे करण्यात आलेल्या पाहणीनुसार भारतात सुमारे ६५.१ दशलक्ष मधुमेही रुग्ण आहेत. तर २०१० मध्ये ५०.८ दशलक्ष मधुमेही आढळून आले होते. म्हणूनच, वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांमध्ये, विशेषतः आरोग्य क्षेत्राचे भवितव्य घडवणाऱ्या या क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये मधुमेहाबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी गाडगे मधुमेह केंद्रातर्फे ´डायबेटिस व्हर्सेस वुई´ ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा २ जानेवारी पासून सुरू  झाली असून १० जानेवारी २०१७ पर्यंत सुरू राहणार आहे. या स्पर्धेचा निकाल २६ जानेवारी रोजी होणा-या डायबेटीस मेला या कार्यक्रमात जाहीर करण्यात येणार आहे.
 
बहुधा वृद्धांपकाळात होणाऱ्या मधुमेह या आजाराने आजकाल अनेक तरुणांनाही ग्रासले आहे. कल्पक व्हिडिओंच्या माध्यमातून मधुमेह या आजाराबाबत जागरूकता निर्माण करणे व या आजाराचे निर्मूलन करणे यासाठी ‘डायबेटिस व्हर्सेस वुई’ ही स्पर्धा महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. हा व्हिडिओ सादर करताना स्पर्धकाने उपस्थित राहणे आवश्यक आहे. मधुमेह म्हणजे काय किंवा त्याचे विविध पैलू सामान्य माणसाला सहज समजतील अशा आकर्षक आणि कल्पक पद्धतीने सांगितले जावेत. सादरकरणाच्या ध्वनिचित्रफितीचा कालावधी तीन मिनिटांपेक्षा अधिक नसावा आणि ही ध्वनिचित्रफित हिंदी भाषेत असावी. एमडी, एमबीबीएस, डेंटल किंवा फिजिओथेरपी या सर्व शाखांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
 
या स्पर्धेच्या विजेत्याला १ लाख रुपयांचा धनादेश मिळणार आहे, तर उपविजेत्याला बक्षीस म्हणून ५० हजार रुपयांचा धनादेश मिळणार आहे. स्पर्धक एकट्याने किंवा समुहाने सहभागी होऊ शकतात. त्यांना त्यांचा व्हिडिओ यूट्युबवर अपलोड करायचा आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ #DiabetesVersesWE असे हॅशटॅग करून फेसबुकवर शेअर करायचा आहे. सर्व स्पर्धकांना फेसबुक पेज’ लाईक’ करायचे आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी स्पर्धकांनी डायबेटिस व्हर्सेस वुई या संकेतस्थळावर अर्ज भरून ती लिंक शेअर करायची आहे. फेसबुकवर सर्वात जास्त लाईक्स मिळविणाऱ्या बक्षीस म्हणून २० हजार रुपयांचा धनादेश मीळणार आहे.
 
“मधुमेहाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी सोप्या आणि किमान शब्दांचा स्पर्धक कसा वापर करतात ते पाहिले जाणार आहे. सगळ्याच स्पर्धकांना ही संकल्पना स्पष्ट झाली नसेल तर असे व्हिडिओ तंत्रज्ञान स्नेही वेळी उपयोगी पडतील. हे व्हिडिओ तरुणांचेही लक्ष आकर्षित करून घेतील आणि त्यांच्याकडून मधुमेहमुक्त आयुष्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय केले जाण्याची शक्यता आहे.”, असे डॉ. गाडगे म्हणतात. डाएट फॉर डायबेटिक्स हा डॉ. गाडगे यांचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काही दिवसांतच व्हायरल झाला होता.
 
“या स्पर्धेमुळे वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन व्यापक होईल. हे विद्यार्थी भविष्यातील डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांना मधुमेहासारख्या जीवनशैलीशी संबंधित विकाराविषयी पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी उपस्थित राहणारे वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आणि इतर यांना मधुमेहाबद्दल माहिती मिळेल”, अशी पुष्टी डॉ. गाडगे यांनी जोडली. या स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी http://www.diabetesversuswe.com/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.