मासिक पाळी पुढे ढकलताय ?

Last Modified शनिवार, 29 फेब्रुवारी 2020 (16:09 IST)
सण, समारंभ, किंवा धार्मिक कार्याच्या आड येणारी मासिक पाळी पुढे ढकलण्याचा निर्णय अनेक महिला घेतात. मात्र अशा प्रकारे निसर्गचक्रात हस्तक्षेप करणं चुकीचं आहे. बरंच प्रबोधन होऊनही मासिक पाळीबबातचे गैरसमज कमी झालेले नाहीत. म्हणूनच महिलांना कृत्रिम पद्धतीने पाळी पुढे ढकलावी लागते. मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतल्या जातात. पण या गोळ्यांचे शरीरावर दीर्घकालीन परिणाम होतात.

* मासिक पाळी पुढे ढकलणार्‍या गोळ्यांच्या सततच्या सेवनामुळे या संदर्भातल्या नैसर्गिक चक्रावर परिणाम होऊ शकतो. शिवाय महिलांच्या प्रजननक्षमतेवरही याचे घातक परिणाम दिसून येतात.

* या गोळ्यांचं सेवन केल्यानंतर पुढचा काही काळ मासिक पाळीदरम्यान मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होण्याची शक्यता वाढते. जवळपास 20 टक्के महिलांना हा अनुभव येतो. पुढचे काही महिने मासिक पाळीतून अधिक प्रमाणात रक्त जाऊ शकतं.
* या गोळ्या बर्‍याच काळपर्यंत घेत राहिल्यास आरोग्यावर अत्यंत घातक असे परिणाम दिसून येतात. नसांमध्ये रक्ताची गुठळी होण्यासारख्या समस्या जाणवू शकतात. या गोळ्यांमुळे इतर औषधांच्या शरीरावरच्या प्रभावावर विपरित परिणाम होऊ शकतो.

* या गोळ्या घेतल्यानंतर इतर काही दुष्परिणाम होऊ शकतात. जुलाब, हातापायांमध्ये गोळे येणं, अवेळी रक्तस्राव होणं हे दुष्परिणाम दिसून येऊ शकतात.

मधुरा कुलकर्णी


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

Beauty Tips : त्वचेला सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी बेकिंग ...

Beauty Tips : त्वचेला सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी बेकिंग सोडा
आपल्या स्वयंपाकघरात अशी एक गोष्ट आहे जी आपल्या केसांना आणि त्वचेला सुंदर आणि निरोगी ...

Expert Advice सायनसची 3 कारणे, 9 लक्षणे आणि उपचार

Expert Advice सायनसची 3 कारणे, 9 लक्षणे आणि उपचार
आजकालच्या धावापळीच्या जीवनशैलीत लोकं आपल्या आरोग्याची काळजी घेउ शकत नाही, त्यामुळे ...

Try this : पोटफुगीवर इलाज

Try this : पोटफुगीवर इलाज
सकाळची सुरुवात प्रसन्नतेने व्हावी, अशी सार्‍यांचीच इच्छा असते. परंतु बर्‍याचदा सकाळीच पोट ...

Lockdown च्या काळाचा सदुपयोग करा, एकमेकांना समजून घ्या

Lockdown च्या काळाचा सदुपयोग करा, एकमेकांना समजून घ्या
आपण कुटुंबात राहत असला वा दोघंच, या वेळी स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी करमणूकची गरज आहे. ...

गोड खावंसं वाटत असल्यास घरच्या घरी सोप्या पद्धतीने पेढे

गोड खावंसं वाटत असल्यास घरच्या घरी सोप्या पद्धतीने पेढे बनवा
कढईत दूध उकळायला ठेवावे. त्यात साय घाला. साखर घालून ढवळून घ्या. दुधाला उकळी येऊ द्या. ...