गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

झोपेच्या गोळ्या घेण्याचे Side Effects,माहीत पडल्यावर उडेल तुमची झोप

जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या असेल आणि स्लीपिंग पिल्स घेतल्यावर तुम्हाला लगेचच झोप येत असेल, पण या झोपेच्या गोळ्यांचे बरेच साइड इफेक्ट्स देखील असतात जसे दिवसा सुस्ती येणे, रात्री वाईट स्वप्न दिसणे, डोके दुखी आणि लाल चकते येणे इत्यादी. या गोळ्यांचा वापर जर चुकीच्या पद्धतीने केला तर तुम्ही कोमात देखील जाऊ शकता किंवा तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो.   
 
यूएसमध्ये किमान 50 ते 70 मिलियन लोक झोप न येण्याच्या आजाराने प्रभावित आहे. सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल एंड प्रिवेंशन ने या आजारपणाला पब्लिक हेल्थ प्रॉब्लम म्हटले आहे. असे बरेच लोक आहे जे कमी झोपले तरी त्यामुळे होणारा थकवा, तणाव इत्यादीला दुर्लक्ष करतात.   
 
दुर्भाग्यवश या औषधांचे बरेच साइड इफेक्ट्स आहे म्हणून याचा वापर करण्याअगोदर यांच्याबद्दल जाणून घेणे फारच गरजेचे आहे की हे काम कसे करतात आणि याचा काय परिणाम होतो. 
 
स्लीपिंग पिल्स कशी काम करते  
दोन प्रकारच्या स्लीपिंग पिल्स असतात एक तर जी आधी चलनामध्ये होती जसे बेन्जोडायजेपाम ज्यात लॉरमेट्राजेपाम, डायजेपाम, निट्राजेपाम किंवा लोप्राजोलाम इत्यादी सामील आहे जी ब्रेनमध्ये झोपेला प्रमोट करणार्‍या रिसेप्टरला टार्गेट करते पण याची तुम्हाला सवय लागते. जेव्हा की न्यू जेनरेशन स्लीपिंग पिल्स आधीच्या तुलनेत जास्त प्रभावकारी असते पण असे नाही आहे की यांचे साइड इफेक्ट्स होत नाही. USच्या नॅशनल सर्वेप्रमाणे संपूर्ण यूएसमध्ये 20 वर्षांच्या सर्व वयस्कांमधून 4 टक्के लोक हा सर्वे होण्याअगोदर स्लिपिंग पिल्सचा वापर करून चुकले आहे.
स्लीपिंग पिल्सचे साइड इफेक्ट्स 
जास्त करून डॉक्टर स्लीपिंग पिल्सला घेण्यास नकार देतात जो पर्यंत रोग्याला गंभीर झोपेची समस्या होत नाही. तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत की या स्लीपिंग पिल्सचा वापर केल्याने कोणते कोणते साइड इफेक्ट्स होऊ शकतात.
 
1दिवसा सुस्ती येणे : काही लोकांना या स्लीपिंग पिल्सचा वापर केल्याने दिवसाच सुस्ती येऊ लागते आणि काही लोकांना त्याच्याही दुसर्‍या दिवशी सुस्ती येते कारण हे औषध तुमच्या शरीरात बर्‍याच वेळेपर्यंत आपला प्रभाव ठेवतो.
 
2रात्री वाईट स्वप्न येणे : जालेप्लोन, जोपिक्लोन आणि जोल्पिडेम इत्यादी असे औषध आहे ज्यांना 2 ते 4 आठवड्यासाठी दिले जाते. काही लोकांना या गोळ्यांमुळे वाईट स्वप्न येतात.
 
3- स्लीप एप्नियाला खराब करते : जर तुम्हाला आधीपासूनच स्लीप एप्नियाचा त्रास असेल तर ह्या स्लीपिंग पिल्स याला अजून खराब करून देते. स्लीप एप्नियामध्ये तुम्हाला झोपताना श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे तुम्ही पूर्णपणे झोप घेऊ शकत नाही आणि जास्त वेळ व्यक्ती जागाच राहतो. 
 
4- ड्रगची सवय लागणे : जर तुम्ही जास्त दिवसांपासून ह्या औषधांचा वापर करत असाल तर तुम्हाला या गोळ्यांची सवय लागते आणि याच्याशिवाय तुम्हाला झोप येत नाही. या औषधांना तुम्ही अचानक सोडू देखील शकत नाही कारण याने देखील त्रास होतो जसे मळमळ, ओकारी आणि बेचैनी होऊ लागते. 
 
5- त्रास होणे : मेलॅटोनिन आधारित झोपेच्या गोळ्या अनिद्रेला जास्त वाढवून देतात. याच्या सेवनामुळे तुम्हाला डोके दुखी, पाठ दुखी किंवा ज्वाइंट्समध्ये दुखायला लागते.  
  
6- मृत्यूची शक्यता : जर तुम्ही स्लीपिंग पिल्ससोबत इतर दुसरे ड्रग जसे वेदनाशावक औषधी किंवा कफ संबंधित औषध घेत असाल तर यामुळे तुम्हाला बरेच त्रास होण्याची शक्यता आहे जसे तुम्ही कोमात जाऊ शकता किंवा तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो.  
  
7- पागलपणा वाढू शकतो : जर तुम्ही स्लीपिंग पिल्सला तीन महिन्यापेक्षा जास्त दिवसांसाठी वापर करत असाल तर तुम्हाला डोक्याशी निगडित बर्‍याच समस्या येऊ शकता जसे तुम्हाला एलजीमर डिसीज होऊ शकत ज्यात तुम्ही गोष्टी विसरू लागता.
 
8- मोर्टेलिटी रिस्क वाढते : साल 2010मध्ये किमान 6 ते 10 टक्के अमेरिकन वयस्कांनी आपल्या अनिद्रेच्या समस्येसाठी स्लीपिंग पिल्सचा वापर केला. सांगायचे म्हणजे जर तुम्ही एका वर्षात या औषधांचा 132 डोज घेता तर तुमच्या मरण्याची शक्यता त्या लोकांच्या तुलनेत 5 पटीने वाढून जाते जे लोक यांना घेत नाही. जर तुम्ही स्लीपिंग पिल्सच्या 132 पेक्षा जास्त डोज घेता तर तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता ही वाढते.
9- हार्ट अटॅकचा धोका : डॉक्टरांप्रमाणे झोपेच्या जास्त गोळ्या घेतल्याने हार्ट अटॅकचा धोका 50 टक्के वाढून जातो. वैज्ञानिकांनी झोपेत असणारे तत्व - जोपिडेमला हार्ट अटॅकचे कारण सांगितले आहे.
 
11. कँसर : एका शोधात असे आढळून आले आहे की जे लोक रोज या गोळ्यांवर निर्भर राहतात, त्यांना कँसर होण्याचा धोका जास्त राहतो. या गोळ्यांमध्ये असे तत्त्व आढळून येतात ज्याचे सेवन रोज करू नये, नाहीतर ओवरडोज होऊन जातो.