testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

तुम्हालाही ऑफिसमध्ये झोप येते का ?

जर तुम्हालाही ऑफिसमध्ये काम करताना झोप येत असेल तर त्यासाठी तुम्ही काय खाता हे जबाबदार आहे. समोसे, पिझ्झा आणि इतर
फास्टफूड झोप येण्यामागचं खरं कारण आहे.

नुकत्याच केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार जे पुरुष चरबी अधिक असणारे पदार्थ खातात ते लोक रात्री कमी झोपतात आणि दिवसा
त्यांना अधिक झोप येते.

ऑस्ट्रेलियामधील एका युनिव्हर्सिटीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, जे लोक फास्टफूड अधिक खातात त्यांच्यामध्ये अनेक विकार वाढतात. झोपकमी झाल्यामुळे विकार अधिक वाढतात आणि झोप कमी होण्यामागे हे फास्टफूड अधिक जबाबदार असतात. चांगल्या आरोग्यासाठी चांगली
झोप आणि चांगला आहार अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे यावर अधिक भर दिला पाहिजे.

35 ते 40 वयाच्या लोकांवर केल्या गेलेल्या या सर्वेक्षणात झोप आणि आहार हेच विकारांना अधिक आमंत्रित देत असल्याचं दिसलं.


यावर अधिक वाचा :