शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

कॅनडातील बाळं सर्वात किरकिरी!

रडणार्‍या बाळाला शांत करणं हे मोठेच जिकिरीचे काम असते. काही बाळं दिवसभर पाळण्यात डाराडूर झोपतात आणि रात्रभर किरकीर करून आई-बाबांच्या नाकीनऊ आणतात. किरकिरण्याच्या बाबतीत जगात कॅनडातील
बाळं सर्वात अव्वल आहेत असे एका पाहणीत आढळले आहे. तिकडची मुलं एकदा रडायला लागली की 3-4 तास सलग भोकाड पसरतात. त्यांना शांत करता करता अनेकदा आई-वडिलांचा रक्तदाबही वाढतो, असेही आढळले आहे! संशोधकांच्या एका गटाने 8700 बाळांची याबाबत पाहणी केली. यासाठी डेनमार्क, इटली, ब्रिटन, र्जमनी, कॅनडा या देशातील मुलांची निवड करण्यात आली. यात ही मुलं दिवसातून किती वेळा, किती तास आणि कोणत्या वेळेस रडतात याचं निरीक्षण करण्यात आलं. 28 संशोधकांनी दिलेल्या अहवालानंतर कॅनडातील मुलं इतर देशांतील मुलांच्या तुलनेत सर्वाधिक रडत असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या मगचं कारण पोटदुखी असल्याचंही या अहवालात आहे. कॅनडानंतर रडण्यात ब्रिटनच्या मुलांचा दुसरा क्रमांक आहे. त्यानंतर इटलीतील 8 ते 9 आठवड्याची 20.9 टक्के बाळं दिवसातले चार तास सलग रडत असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे.