1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मार्च 2021 (19:41 IST)

आपल्या आहारात काकडी समाविष्ट करा हे 10 फायदे मिळतात

HEALTHBENEFITS KHEERA 10 BENEFITS TO INCLUDING CUCUMBER IN YOUR DIAT HEQALTH ARTICLE IN MARATHI KAKDIKHANYACHE FAYDE KAKDI ANI AROGYA CUCUMBER AND HEALTH MARATHI HEALTH ARTICLE IN WEBDUNIA MARATHI
काकडी खूपच पौष्टिक असते. ही आरोग्यास फायदे देते. काकडी पासून मिळणाऱ्या फायद्यांविषयी जाणून घेऊ या. 
 
1 काकडी ही डोळ्यांना थंडावा देते.म्हणूनच ब्युटी पार्लर मध्ये देखील काकडी च्या रसाचे आईस क्यूब वापरतात. काकडी डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्याचा ताण नाहीसा होतो. काकडी चे तुकडे कापून डोळ्यांवर ठेवा. असं केल्याने डोळ्यांची जळजळ कमी होते. 
 
2 काकडी तहान कमी करते.काकडी शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते. काकडी खाल्ल्याने शरीराला पुरेसे पाणी मिळते. 
 
3 काकडी खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर निघतात. ही आतड्यांची चांगल्या प्रकारे स्वच्छता करते. 
 
4 काकडी खाल्ल्याने छातीची जळजळ कमी होते. सूर्य प्रकाशामुळे त्वचा भाजली  असेल तर काकडी लावल्याने थंडावा मिळतो. 
 
5 दररोज आपल्या आहारात व्हिटॅमिन्स घेणं आवश्यक आहे. आहारात व्हिटॅमिन ए,बी आणि सी चा समावेश करावा. काकडीमुळे दररोज व्हिटॅमिन्स मिळतात. काकडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.  
 
6 गुळगुळीत आणि मऊ त्वचा मिळविण्यासाठी काकडीचे सेवन करावे. या मध्ये पोटॅशियम,मॅगनीज आणि सिलिकॉन मुबलक प्रमाणात आढळते. हे खनिज त्वचेसाठी आवश्यक आहे. 
 
7 काकडी वजन कमी करते. ज्या लोकांना आपले वजन कमी करावयाचे आहे. त्यांनी सूप आणि सॅलडचे सेवन करावे. कारण काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असतात. कॅलरी नसते. म्हणून हे  खाल्ल्याने पोट भरलेले वाटते.
 
8 या मध्ये फायबर असते जे अन्न पचन होण्यास मदत मिळते. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास दररोज काकडीचे सेवन करावे. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी हे प्रभावी औषध आहे.  
 
9 काकडी कर्क रोगाचा प्रतिकार करते. हे खाल्ल्याने कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. या मध्ये इकोइसोलएरीक्रिस्नोल, लैरीक्रिस्नोल आणि पाइनोरिस्नोल घटक असतात. हे घटक सर्व प्रकारच्या कर्करोगाचा प्रतिबंध करण्यास सक्षम असतात. 
 
10 काकडीमध्ये असलेले घटक सिलिशिया केसांची आणि नखांची चमक वाढवतात आणि केस आणि नखे बळकट करतात. या मध्ये असलेले सल्फर आणि सिलिशिया मुळे केस जलद गतीने वाढतात.