काय म्हणता ? व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोरोनाचा धोका वाढतो

vitamin d
Last Modified शनिवार, 9 मे 2020 (15:24 IST)
शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा धोका वाढतो. एवढच नव्हे तर व्हिटॅमिन डीचं प्रमाण कमी झाल्याने कोरोना रुग्णाच्या मृत्यूचा धोका वाढतो. २० युरोपियन देशांवर नुकत्याच झालेल्या संशोधनात हे उघड झालं आहे. अँगलिया रस्किन विद्यापीठ आणि क्वीन एलिझाबेथ रुग्णालयाच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.
पूर्वीच्या संशोधनात कमी प्रमाणात व्हिटॅमिन डी आणि श्वसन रोगांचे गंभीर संबंध आढळले आहेत. व्हिटॅमिन डी पांढर्‍या रक्त पेशींच्या प्रतिक्रियांना नियंत्रण करतो, ज्यामुळे अधिक सूज निर्णाण करणाऱ्या सायटोकिन्स सोडण्यास प्रतिबंधित करते. कोरोना विषाणूंमुळे सूज निर्णाण करणाऱ्या साइटोकिन्स जास्त प्रमाणात निर्णाण होतात.

नवीन संशोधनात असं आढळले आहे की इटली आणि स्पेनमधील सरासरी व्हिटॅमिन डीची पातळी इतर युरोपियन देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. ज्यामुळे या देशांमध्ये कोविड-१९ संबंधित मृत्यू जास्त आहेत. दक्षिण युरोपमधील लोक कडक उन्हापासून बचाव करतात. उत्तर युरोपमधील व्हिटॅमिन डीच्या उच्च सरासरी पातळीचे कारण उन्हात अधिक बसणं आणि कोड लिव्हर ऑइल वापरणं आहे. “व्हिटॅमिन डीची सरासरी पातळी आणि कोविड-१९ संसर्ग आणि मृत्युदर यांच्यात संबंध आहे,” असं संशोधन करणारे डॉक्टर ली स्मिथ यांनी सांगितलं. ज्या वृद्धांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे, त्यांच्यावर कोविड-१९ चा तीव्र परिणाम होत आहे. या प्रकरणात, कोविड-१९ च्या उपचार दरम्यान व्हिटॅमिन डी पूरक आहारांचा वापर केला पाहिजे.


यावर अधिक वाचा :

अकरावीसाठी १५ जुलैपासून अर्ज सादर करता येईल

अकरावीसाठी १५ जुलैपासून अर्ज सादर करता येईल
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील ज्युनियर कॉलेजांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ...

गांजाच्या पानांची भाजी मेथी समजून खाल्ली आणि संपूर्ण ...

गांजाच्या पानांची भाजी मेथी समजून खाल्ली आणि संपूर्ण कुटुंबाची शुद्ध हरपली
उत्तर प्रदेश येथील एका कुटुंबाने मेथी समजून चक्क गांज्याची भाजी शिजवून खाल्ल्याचा विचित्र ...

मुंबईला ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता

मुंबईला ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून ...

WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स फीचर युजर्ससाठी रोलआउट

WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स  फीचर  युजर्ससाठी रोलआउट
फेसबुकची मालकी असलेल्या WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स या हे फीचर कंपनीने युजर्ससाठी ...

फेसबुकचे नवे मजेशीर फीचर 'Avatars’

फेसबुकचे नवे  मजेशीर फीचर  'Avatars’
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने युजर्ससाठी एक मजेशीर फीचर आणलं आहे. याद्वारे युजर्स ...

कान दुखत आहे ? तर लसणाचे हे 5 उपाय करून बघा

कान दुखत आहे ? तर लसणाचे हे 5 उपाय करून बघा
कानात मळ साचणे, सर्दीमुळे कान दुखणे किंवा कोणत्याही प्रकाराचे एलर्जी किंवा संसर्ग होणं ही ...

नेटवर्किंग चांगले ठेवण्यासाठी...

नेटवर्किंग चांगले ठेवण्यासाठी...
जर आपण कामाच्या ठिकाणी सहकार्यां बरोबर चांगले नेटवर्क तयार केले तर आपल्याला व्यावसयिक ...

हृदयविकार टायाळचा असेल तर आठवड्यात १२ अंडी खा

हृदयविकार टायाळचा असेल तर आठवड्यात १२ अंडी खा
अंड्यामध्ये प्रथिने आणि पोषक घटक अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे अंडे हे आरोग्यास उत्तम ...

जांभळाचे फायदे आपल्याला माहित आहेत का?

जांभळाचे फायदे आपल्याला माहित आहेत का?
जांभळाच वैज्ञानिक नाव सिजीगियम क्युमिनी आहे. जांभूळ हे अम्लीय प्रकृतीचं फळ आहे. पण चवीला ...

Flax Seed For Hair : केसांसाठी जवसाचे 5 सर्वोत्तम फायदे

Flax Seed For Hair : केसांसाठी जवसाचे 5 सर्वोत्तम फायदे
जवसाचे वापर कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तसेच त्वचा आणि सौंदर्यासाठी करतात. पण ही जवस ...