शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 मे 2017 (11:32 IST)

Calcium Supplements गर्भवती स्त्रियांना घेणे का जरूरी आहे ?

गर्भावस्थेत महिलांना फॉलीक ऍसीड, आयर्न प्रमाणेच कॅल्शियमची देखील अधिक आवश्‍कता असते, हाडांच्या मजबूती व विकासासाठी शरीराला कॅल्शियम गरजेचे असते. म्हणूनच तुमचे डॉक्टर तुम्हाल कॅल्शियम सप्लीमेंट घेण्याचा सल्ला देतात. 
 
* अर्भकाच्या हाडांची वाढ व विकासात मदत – गर्भाच्या हाडांच्या विकासासाठी कॅल्शियमची गरज असते हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. गर्भाची वाढ व विकास होण्यासाठी गर्भवती महिलांनी आपल्या आहारातून पुरेसे कॅल्शियम घेणे आवश्‍यक असते. तिच्या आहारातून तिला पुरेसे कॅल्शियम मिळत नसल्यास तिला कॅल्शियम सप्लीमेंट घेण्याची गरज भासू शकते.
 
* प्रेगन्सीमध्ये हाडांची झीज होण्यापासून बचाव – बाळाच्या हाडांच्या विकासासाठी कॅल्शियमचा अधिक पुरवठा होत असल्याने गर्भवती महिलांमध्ये कॅल्शियमचा अभाव होऊ शकतो. त्यामुळे तिस-या तिमाहीमध्ये तिच्या हाडांची झीज होण्याचे प्रमाण वाढते व हाडांची मिनरल डेन्सिटीदेखील कमी होते. या समस्येपासून वाचण्यासाठी तिने पुरेसे कॅल्शियम सप्लीमेंट घेणे आवश्‍यक असते.
 
* स्तनपानासाठी दूधनिर्मितीचे प्रमाण वाढते – स्तनपान करताना दूधनिर्मिती होण्यासाठी कॅल्शियमची गरज असते ही गोष्ट अनेक महीलांना माहित नसते त्यामुळे पुढे स्तनपान करताना तिच्या शरीरातील कॅल्शियमच्या वापरावर ताण येतो. स्तनपान करताना महिलांना दिवसभरात 300 ते 400 मिग्रॅ कॅल्शियमची गरज असते. त्यामुळे ही गरज भागवण्यासाठी शरीर मातेच्या हाडांमधील कॅल्शियम शोषते. त्यामुळे सहाजिकच मातेच्या हाडांमधील कॅल्शियम कमी होते. ही समस्या टाळण्यासाठी डॉक्‍टर गरोदरपणापासूनच तिला पुरेसे कॅल्शियम सप्लिमेंट घेण्याचा सल्ला देतात.