शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

आपल्याला होते फूड अॅलर्जी, तर हे वाचा

जेव्हाही आपले शरीर खाण्याप्रती अधिक क्रियाशील होतं तेव्हा फूड अॅलर्जीची तक्रार होऊ शकते. अशात काही प्रोटीन युक्त आहारदेखील आपल्या शरीराला नुकसान करू शकतात कारण काही लोकांची प्रतिकार शक्ती काही पदार्थांना प्रतिसाद देऊ शकत नाही आणि त्याचे दुष्परिणाम म्हणून अॅलर्जी दिसून येते.


 
मुख्यतः: लोकांना मैदा, सोया, अंडी, मासे, शेंगदाणे, काही विशिष्ट मसाले किंवा एखाद्या तेलाच्या प्रकारची अ‍ॅलर्जी असते. कधी कधी अ‍ॅलर्जी टेस्ट मध्येही अ‍ॅलर्जी नेमकी कसली आहे हे कळून येत नाही. अशात ते आपल्यालाच शोधून काढायला हवे. एकदा अ‍ॅलर्जी कोणत्या पदार्थांची आहे समजल्यावर पथ्ये पाळणे आवश्यक असतं.
 
पुढे वाचा अॅलर्जीचे लक्षण...

सामान्यतः अॅलर्जीचे हे लक्षण असतात-
 
* खाज सुटणे
* डोळे, ओठ आणि चेहर्‍यावर सूज येणे
* अतिसार
* श्वास घेयला त्रास होणे
* हृद्याच्या ठोक्यांची गती वाढणे


यापासून वाचण्यासाठी- 
 
* जर आपल्या चण्यामुळे त्रास होत असेल तर चण्याशी संबंधित सर्व धान्य टाळावे.
 
* आपल्याला आहारात घेणार्‍या वस्तूंचे वैज्ञानिक नाव माहीत पाहिजे.
 
* बाहेर आहार घेताना विशेष काळजी घ्यावी.


 
* नेहमी विपरित परिणामांसाठी सजग राहावे.
 
* अॅलर्जी होण्याचे इतर काही कारणंही असू शकतात, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जसे की बॅकरी आयटम्समुळे आपल्याला त्रास होत असेल तर शक्य आहे की आपल्याला अंड्याची अॅलर्जी असेल. 
 
म्हणूनच काहीही तोंडात टाकण्याआधी तो पदार्थ आपल्या शरीरासाठी योग्य आहे वा नाही याची काळजी घ्यावी.