शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

घोरण्याचा त्रासापासून मिळवा मुक्ती

दिवसभराच्या थकव्यानंतर आपल्या शरीराला कमीत कमी 6 ते 8 तासांची निवांत झोप महत्त्वाची असते. पण कित्येकदा आपली झोप पूर्ण होत नाही आणि त्यामागील कारण असतं घोरणे.
 
जेव्हा आपला साथीदार किंवा घरातील कोणीही व्यक्ती जोर जोराने घोरत असेल तेव्हा झोप लागणे कठिण होऊन जाते. जर घोरण्यामुळे आपण ही परेशान आहात तर अमलात आणा हे सोपे उपाय:

घोरण्यापासून मुक्तीसाठी आपल्या आहारात बदल करणे आवश्यक आहे. काही पदार्थांचे पथ्य पाळावे ज्याने आपल्या श्वासनलिकेत कोणतेही व्यवधान उत्पन्न होणार नाही आणि आपण घोरण्यापासून मुक्त होऊ शकाल.
रात्री हे पदार्थ खाणे टाळावे:
* डेअरी उत्पादने
मैद्याने बनलेले पदार्थ
गोड पदार्थ
चॉकलेट
मसालेदार पदार्थ
तेलकट पदार्थ
दारू

खालील दिलेलं ज्यूस पिण्याने घोरण्याची सवय सुटेल.
चार गाजर, एक सफरचंद, लिंबू आणि थोडंसं आलं


 
हे चारी पदार्थ मिक्सर मध्ये फिरवून ज्यूस तयार करा. हे ज्यूस रोज पिण्याने घोरण्याचा त्रास कमी होईल आणि आपण निवांत झोप काढू शकाल.