शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

जमीनवर ठेवू नये तांब्याचा लोटा

रात्री तांब्याच्या लोट्यात पाणी भरून ते पाणी पहाटे पिण्याची पद्धत आरोग्यासाठी चांगली मानली आहे. पण त्या तांब्याच्या लोट्याला ठेवण्याची पद्धत चुकीची असेल तर त्या पाण्याचं आरोग्यावर काही असर होणार नाही. पाहू या पाणी भरलेलं तांब्याचा लोटा कसा ठेवायला हवा.
 
रात्रभर तांब्याच्या लोट्यात पाणी ठेवल्याने तांब्याचे आरोग्यदायी गुण त्या पाण्यात येतात, जे पोटासंबंधी रोगांपासून ते त्वचा शुद्ध करण्यापर्यंत उपयोगी असतं. पण हे गुण तेव्हाच मिळू शकतात जेव्हा आपण तो लोटा योग्य ठिकाणी ठेवला असेल. 


 
म्हणून जेव्हाही आपण तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवाल, तेव्हा लक्षात ठेवा की ते भांड जमीनीवर अजिबात ठेवू नये. जमीनीवर ठेवण्याऐवजी आपण ते लाकडाच्या किंवा एखाद्या धातुच्या पाटावर किंवा टेबलावर ठेवू शकता. 
 
जमीनीवर लोटा ठेवल्याने पाण्यात तांब्याच्या गुणांचा शोषण होण्याऐवजी गुरुत्वाकर्षणामुळे त्यांचे शोषण जमीनीत होतं. यामुळे आपल्याला योग्य गुणधर्म मिळणे शक्य होता नाही.