गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

फायदेशीर पण असतात बॅक्टीरिया

असे मानले जाते की बॅक्टीरिया रोग पसरवतात पण काही संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की काही बॅक्टीरिया असे ही असतात जे आपल्या शरीराला गंभीर आजारापासून वाचवतात. हे बॅक्टीरिया फूड किंवा सप्लिमेंटद्वारे मिळू शकतात. हे फायदेशीर बॅक्टीरिया प्रोबायोटिक्स म्हणून ओळखले जातात.
 
वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशनप्रमाणे प्रोबायोटिक्स लाइव्ह मायक्रोऑर्गेनिज्म असतात. हे खाद्य पदार्थांच्या व्यतिरिक्त औषधरूपात ही मिळतात. हे बॅक्टीरिया प्राकृतिक रूपाने आमच्या आतड्यांमध्ये असलेले गुणकारी बॅक्टीरियासारखे असतात. यांच्यात शरीरातील हानिकारक बॅक्टीरिया रोखण्याची ताकद असते. हे आतड्यांना निरोगी ठेवतात आणि पचन क्रियेत मदत करतात. हे रोग प्रतिकार प्रणाली मजबूत करतात.
 
जास्त प्रमाणात जंक फूड खाणार्‍यांसाठी प्रोबायोटिकचे नियमित सेवन फायदेशीर आहे. दही, ताक, आणि आंबवलेले पदार्थांतून प्रोबायोटिक्स मिळतात.