गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

भारतात वाढत आहे धूमपान करणार्‍यांची संख्या

भारतात धूमपानाचे व्यसन सोडण्याचे तमाम प्रकार निष्फळ ठरत आहेत. एका ताज्या सर्वेक्षणानुसार 18 व्या वर्षात धूमपान करणार्‍या पुरुषांच्या संख्येत 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतात धूमपान करणार्‍यांची संख्या 10.80 कोटींच्या घरात पोहचली आहे. याबाबतीत भारत चीनच्या मागोमाग आहे.
 
टॉरेंटो युनिव्हर्सिटीमधील भारतीय वंशाच्या प्रभात झा यांनी आपल्या सर्वेक्षणात याचा खुलासा केला आहे. हे सर्वेक्षण 1998 ते 2015च्या दरम्यान केले गेले. या संशोधनात 15 ते 69 वयोगटातील लोकांचा समावेश केला गेला. 
 
देशात सतरा वर्षापूर्वी धूमपान करणार्‍या पुरुषांची संख्या 7.9 कोटींच्या घरात होती. ज्यात 2.9 कोटींची वाढ झाली आहे. देशात धूमपान करणार्‍या महिलांची संख्या 1.1 कोटी आहे. याबाबत अधिक माहिती देताना प्रभातने वर्ष 2010मध्ये धूमपानामुळे दहा लाख लोकांचा बळी गेला होता. ज्यात 70 टक्के लोक 30 ते 69 वयोगटातील होते.