शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

'सी' व्हिटॅमिनमुळे दिसा स्मार्ट!

चेहर्‍यावर पडलेल्या सुरकत्या, पिकलेले केस व गळालेले हातपाय, ही लक्षणे आहेत वय झाल्याचे. तुमचे वय वाढले आहे, हे तुमचा चेहरा इतराना सांगत असतो. वाढत्या वयाचा परिणाम चेहर्‍यावर स्पष्ट जाणवत असतो. मात्र 'सी' व्हिटॅमिन तुमचे सौंदर्य आबादीत ठेवण्‍यासाठी सहाय्यक ठरू शकते. तुम्ही वाढत्या वयातही आकर्षक दिसू शकता. हे वाचून तुम्ही म्हणाल, काय सांगता? मात्र हे खरंय. व्हिटॅमिन 'सी'चे सेवन हे तुम्हाला फायदेशीर साबीत होऊ शकते, हे एका संशोधनात सिद्ध झाले आहे.

व्हिटॅमिन 'सी' आपल्याला आकर्षक, तरुण बनवणार्‍या आपल्या शरीरातील पेशीमध्ये मिसळत असते.

आपल्याला आकर्षक करणार्‍या पेशींना व्हिटॅमिन 'सी' हे बळ प्रदान करत असते. आपल्या वाढत्या वयानुसार या पेशी ही कमकुवत होत असतात. यासंदर्भात संशोधकांनी उंदरांवर प्रयोग करून पाहिला आणि तो यशस्वी झाला.