शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (09:50 IST)

जेवण झाल्यावर लगेच आडवे पडता का? होय... तर नक्की वाचा

आपणास देखील जेवून लगेच झोपण्याची सवय असल्यास हे वाचा.
बहुतेक लोकांची सवय असते जेवण केल्यास त्वरितच झोपायची. तसेच व्यस्त दिनचर्येमुळे, दिवसभराच्या दगदगी मुळे शरीर थकल्याने थोड्या वेळ फिरणे सुद्धा त्यांच्यासाठी शक्य नसतं. त्या कारणास्तव रात्रीचे जेवण केल्यावर त्यांचे पाय आपसूकच पलंगाकडे वळतात. पण जेवण केल्यावर लगेच झोपल्यावर आपल्या आरोग्यास तोटा संभवतो. 
 
* जेवण केल्यावर लगेच झोपल्यानं पोटाचे विकार संभवतात या मुळे जेवण पचतं नाही जेणे करून ऍसिडिटी, पोटदुखी, छातीत जळजळ सारखे त्रास सुरु होतात. म्हणून जेवण करून लगेचच झोपू नये. काही वेळ फिरावे. मगच झोपायला जावं.
 
* लगेच झोपल्यानं जेवण पचू शकत नाही त्यामुळे जडपणा जाणवतो. अश्या परिस्थितीत झोपेची समस्या उद्भवू शकते. पोटाच्या त्रासामुळे आपल्याला चांगली शांत झोप सुद्धा लागणार नाही.
 
* जेवण केल्यावर लगेच झोपल्यानं जेवण पचतं नाही त्यामुळे अतिसार आणि उलट्या सारखे त्रास संभवतात.
 
* जर आपण जेवण केल्यावर लगेच झोपी जाता, तर अन्नामध्ये असलेल्या कॅलरीला जळण्यास वेळचं मिळत नाही. जेणे करून आपले वजन सुद्धा वाढू शकतात. 
 
म्हणून असे म्हणतात की रात्री झोपण्याच्या 3 तासा पूर्वी जेवण करावं. जेणे करून ते सहज पचू शकेल आणि कॅलरी व्यवस्थितरीत्या जळतील.