1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 19 डिसेंबर 2020 (10:09 IST)

दर रोज 30 मिनिटे पायी चालण्याचे फायदे कळल्यावर कधीच कंटाळा करणार नाही

आपण हिप्पोक्रेट्स बद्दल ऐकलेच असणार ? चालणे हे माणसांसाठी सर्वोत्कृष्ट औषध आहे? चांगली झोप आणि निरोगी आहारासह पायी चालणे आपल्याला पूर्णपणे डॉक्टरांना टाळण्यासाठी मदत करू शकते. दररोज नियमितपणे 15 -30 मिनिटे पायी चालणे एखाद्या माणसाच्या आरोग्यातच सुधार करीत नाही. तर त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. 
 
सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवन शैलीत आपण जास्त पायी चालत नाही. या कोरोनाच्या साथीच्या रोगामुळे आपल्याला घरात राहायला भाग पाडले आहे. परंतु आपल्याला पायी चालण्यासाठी दररोज काही वेळ काढायला पाहिजे. कारण ह्याचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहे हे आपल्याला बऱ्याच आजाराशी लढण्यात मदत करतो. दररोज 30 मिनिटे पायी चालण्याचे फायदे जाणून घ्या 
 
1 मेंदूत सकारात्मक बदल होतात -
 दररोज नियमितपणे पायी चालणे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. एका अभ्यासानुसार असे सांगितले आहे,की कमी प्रभाव वाले एरोबिक व्यायामामुळे जसे पायी चालणे सुरुवातीच्या डिमेन्शिया किंवा स्मृती भ्रंशाला होण्यापासून रोखते, अल्झायमर सारख्या रोगाचा धोका कमी करतं. एकंदरीत मानसिक आरोग्य सुधारतो.
 
2 हृदयरोगाचा धोका कमी करत - 
हृदय रोगाचा धोका कमी करण्या विषयी बोलावे, तर चालणे हे खूप प्रभावी ठरते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, जेव्हा हृदय रोग किंवा स्ट्रोक पासून बचाव करण्याची  वेळ येते तेव्हा पायी चालणे हे धावण्यापेक्षा कमी प्रभावी नाही. ही क्रिया उच्च रक्तदाब आणि कॉलेस्ट्रालच्या पातळीला कमी करून, रक्त परिसंचरण सुधारून हृदया संबंधी समस्या टाळण्यात मदत करतात.
 
3 फुफ्फुसांना प्रशिक्षण देतं -
पायी चालणे एक एरोबिक व्यायाम आहे, ज्यामुळे रक्त प्रवाहात ऑक्सिजन च्या प्रवाहाला वाढवतं. हे शरीरातील विषाक्त घटक आणि कचरा दूर करण्यासह फुफ्फुसाला प्रशिक्षण देण्याच्या कामात मदत देखील करत. पायी चालण्यामुळे चांगली आणि दीर्घ श्वास घेतल्यामुळे फुफ्फुसांच्या आजाराशी संबंधित लक्षणे कमी करता येतात.
 
4 स्वादुपिंडासाठी फायदेशीर आहे.
 या वर कदाचित आपला विश्वास बसणार नाही, पण व्यायामा प्रमाणेच पायी चालणे, धावण्यापेक्षा मधुमेहाला रोखण्यासाठी अधिक प्रभावी ठरते. एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की पायी चालणाऱ्या लोकांच्या एका गटाने 6 महिन्यांच्या प्रायोगिक कालावधीत असलेल्या धावणाऱ्याच्या  गटाच्या तुलनेत ग्लूकोज सहिष्णुता (म्हणजे किती चांगल्या प्रकारे रक्त साखरेला शोषतो). मध्ये अंदाजे 6 पटीने सुधार करून उत्तम प्रदर्शन दाखवले आहे.

5 पचन सुधारतो - 
दररोज नियमितपणे 30 मिनिटे चालणे भविष्यात केवळ पोटाच्या कर्करोगाच्या धोक्याला कमी करत नाही, तर पचन आणि बद्धकोष्ठता देखील सुधारू शकते. ज्यामुळे शरीरास मल त्यागायला किंवा शरीरातील घाण नियमितपणे काढायला मदत मिळते.  
 
6 सांधे आणि हाडे बळकट बनवते - 
पायी चालणे सांध्यात अधिक गतिशीलता देते, हे हाडांच्या नुकसानाला रोखण्यास मदत करत. तसेच फ्रॅक्चरचा धोका देखील कमी करतं. संधिवात फाउंडेशन सांध्यांच्या दुखण्याला कमी करण्यासाठी नियमितपणे दिवसातून किमान 30 मिनिटे चालण्याचा सल्ला देतो. असं केल्याने सांध्यातील कडकपणा आणि सूज कमी करण्यात मदत होते.