1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 15 फेब्रुवारी 2023 (10:52 IST)

Diabetes Diet : डायबेटिक डायट

diabetic food
डायबेटिसच्या रुग्णांनी खाण्यापिण्याबाबत विशेष पथ्य पाळणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आम्ही आपल्या काही खास टिप्स देत आहोत. त्या पुढीलप्रमाणे - 
 
साखरयुक्त पदार्थ, मध, सरबत, सिरप, कोल्ड्रिंक्स, गूळ, तूप, केक, पेस्ट्री, आइस्क्रीम, दारू, बिअर आदींचे डायबेटिस झालेल्या रुग्णांनी सेवन करू नये. 
 
भाज्या जमिनीत येतात. उदा. बटाटे, रताळी, इत्यादी. भाज्या खाणे टाळाव्यात. 
 
केळी, चिकू, आंबा, सीताफळ, द्राक्ष, पपई, ऊस आदी फळे वज्र्य करावीत. 
 
काजू, मनुका, बदाम, भुईमुगाच्या शेंगा, अखरोट आदी सुकामेवा टाळावा. 
 
मांसाहार टाळावा. ल्ल भात, वरण, दूध, पनीर, दही, मासे, पपई, चिवडा, पेरू आदी पदार्थ कमी प्रमाणात खावेत. 
 
कच्च्या भाज्या. उदा. मेथी, पालक, दुधी भोपळा, मुळा, कोथिंबीर, गोभी, चवळी, टमाटर, कांदा, कारले, कांद्याची पात, कैरी, लिंबूपाणी आदी पदार्थ भरपूर प्रमाणात खावे.
 
विशेष फायदेशीर
 
कारले, कडूनिंब, दानामेथी यांचा काढा दररोज प्यावा. 
 
सकाळच्या प्रहरी मोकळ्या हवेत फिरावे.
 
जास्त तणावात राहू नये. जागरण कमी करावे. 
 
नियमित व्यायाम, प्राणायाम करावा आणि शांत झोप घ्यावी.