शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 6 सप्टेंबर 2023 (08:49 IST)

Eat rice daily रोज भात खात असाल तर जाणून घ्या...

Eat rice daily डायटिंग करणारे तांदुळाचे पदार्थ खाणे टाळतात. पण काय आपल्या माहीत आहे की भात खाण्याचे किती फायदे आहेत? प्रत्येक पदार्थांप्रमाणे तांदूळ खाणेही आरोग्यासाठी फायदेशीर आहे पण लिमिटमध्ये. तसेच मधुमेह आणि दमा रोगींसाठी मात्र तांदूळ नुकसान करू शकतं, कारण याची प्रकृती गार असते. तर चला पाहू या भात खाण्याचे फायदे:
 
एनर्जी मिळते: एक वाटी भात खाल्ल्याने शरीराला कार्बोहाइड्रेट्स मिळतं आणि मेंदू सुरळीत काम करतं. याने शरीराचे मेटाबॉलिझम वाढतं आणि आपल्याला दिवसभर अॅक्टिव्ह राहण्यासाठी एनर्जी मिळते.
 
बीपी नियंत्रण: आपल्या हाय बीपीची तक्रार असेल तर दररोज एक वाटी भात खायला हवा. यात सोडियमची मात्रा नसते म्हणून हृदयासंबंधी रोगांपासून बचाव होतो.
 
लो कोलेस्टरॉल लेवल: भातात कोलेस्टरॉलची मात्रा नावाला असते. तरीही आपण कोलेस्टरॉल फ्री राईस सेवन करू शकता.
 
कर्करोगापासून बचाव: ब्राउन राईसचे सेवन कर्करोगापासून बचाव करतं.
 
त्वचा उजळते: आयुर्वेदाप्रमाणे त्वचा तेजस्वी हवी असल्यास तांदूळ खायला हवा. तसेच तांदुळाच्या पाण्याने ज्याला माढ म्हणतात, त्वचेची सर्व तक्रार दूर होते. यात आढळणारे एंटीऑक्‍सीडेंट सुरकुत्या कमी करतं.
 
अलझायमर आजार दूर होतो: दररोज भात खाल्ल्याने आपल्या मेंदूत न्यूरोट्रांसमीटरचा विकास जलद गतीने होईल, जे अलझायमर आजाराशी लढण्यात सहायक राहील. 
 
उष्णतेवर नियंत्रण: उष्ण वातावरणात भात खाणे फायद्याचे आहे. पोटात उष्णता असल्यास दररोज भात खाल्ल्याने शरीराला शरीर थंडपणा मिळतो. 
 
हृदय रोगींनी ब्राउन राईस या वाईल्ड राईस सेवन करावे.