बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (09:26 IST)

पोटाची चरबी कमी करण्यासाठी केवळ 60 सेकंदाचा व्यायाम

पोटाचा घेर कमी करण्यासाठी लोकं काही ही करण्यासाठी तयार असतात. पोटाचा घेर म्हणजे आपल्या शरीरावरील साचलेली अतिरिक्त चरबी. पोटाची चरबी कमी करून फ्लॅट टमी मिळविण्यासाठी बरेच व्यायाम आहेत. पण आम्ही इथे आपल्याला सांगत आहोत अश्या व्यायामाबद्दल ज्याला आपण दररोज किमान 60 सेकेंद तरी केले तरी आपल्याला योग्य परिणाम मिळतील. 
 
होय, आणि या व्यायामाचे नाव आहे प्लॅन्क (Plank). तज्ज्ञांच्या मते, याला नियमित केल्याने पोटाची चरबी कमी होऊन सपाट पोट मिळतं. चला तर मग जाणून घेऊया व्यायाम करताना लक्षात ठेवण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी-
 
1 प्लॅन्क शरीराची कॅलोरी जाळण्यासाठीचा हा सर्वोत्तम व्यायाम आहे. हे करताना जी स्थिती बनते त्यामुळे सर्व स्नायू एकत्ररीत्या सक्रिय होतात, ज्यामुळे संपूर्ण शरीराला फायदा होतो.
 
2 या व्यायामामुळे फ्लॅट टमीसह शरीराची मुद्रा सुधारण्यास देखील मदत होते. 
 
3 दिसायला जरी हा व्यायाम सोपा असेल तरी हा करायला थोडं अवघड आहे. हा व्यायाम करण्यासाठी संतुलनाची आवश्यकता सर्वात जास्त असते.
 
4 तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जर आपण किमान 60 सेकंदापर्यंत 3 वेळा प्लॅन्क करता तर या मुळे पोटाची चरबी कमी होऊन फ्लॅट टमी करण्यास मदत मिळते. तसे, आपण व्यायामाच्या या स्थिती मध्ये जितके जास्त काळ राहू शकता तेवढे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. हळू-हळू करून वेळ वाढवा आणि शक्य असेल तेवढ्या वेळच करावं.