बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 18 मार्च 2021 (08:30 IST)

मास्क मुळे होणाऱ्या त्वचेच्या संसर्गापासून मुक्त होण्यासाठी टिप्स अवलंबवा

सध्या कोविडला टाळण्यासाठी मास्क आवश्यक आहे, कारण मास्कचा वापर केल्याने आपण या प्राणघातक संसर्गापासून वाचू शकतो.परंतु दीर्घ काळ हा मास्क लावणे अवघड होते. 
सध्या मास्क लावून अस्वस्थता जाणवते, त्वचे मध्ये देखील पुरळ आणि मुरूम या सारख्या समस्या उद्भवतात. चला तर मग जाणून घेऊ या की त्वचेचा या समस्येपासून मुक्त कसे राहावे. 
त्वचेचा प्रकार कोणता ही असो अधिक काळा पर्यंत मास्क घातल्याने त्वचेमधून निघणारा घाम, चेहऱ्यावरील तेल आणि धूळ, या मुळे त्वचेशी संबंधित त्रास होऊ लागतात. मास्क लावणे आवश्यक आहे. श्वास घेतल्याने मास्कच्याआत ओलावा वाढू लागतो. तसेच त्वचेवर घर्षण सारखे त्रास वाढू लागतात. मास्क चा वापर केल्यानं नाकाच्या जवळ लाल पुरळ होतात. 
मुरूम आणि लालसर पुरळ देखील होतात.
 
या पासून वाचण्यासाठी काय करावे.
    
* कोरोना पासून वाचण्यासाठी मास्क घालणे आवश्यक आहे. तसेच त्वचे ला होणाऱ्या त्रासापासून काळजी घेण्यासाठी सावधगिरी बाळगणे देखील आवश्यक आहे. 
 
* मास्क लावण्यापूर्वी क्रीम किंवा मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावावे. 
 
* त्वचा संवेदनशील असल्यास नियासिनमेड बेस्ड ऑईन्मेंट्स चा वापर करावा. हे वापरण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
 
* मास्कचा वापर बदलून बदलून करावा. जेणे करून त्यावरील घाण चेहऱ्यावर लागू नये. 
 
* मास्क चा वापर करताना मेकअपचा वापर कमी करावा. 
 
*  जर आपण घरात तयार केलेल्या कापडी मास्क चा वापर करत आहात तर त्याच्या स्वच्छतेची काळजी घ्या जेणे करून मास्कची घाण निघून जाईल.