'तो' त्रास पुन्हा नको...  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  हृदयविकाराचा झटका आल्यानंतर धूम्रपान सोडायला हवं. सध्या काही महिलाही धुम्रपान करतात. हे लक्षात घेता हा सल्ला महत्त्वाचा ठरतो. 
				  													
						
																							
									  
	 
	* ट्रान्स फॅट आणि स्निग्ध पदार्थ वर्ज्य करा. तूप, तेलाचा आहारात नाममात्र वापर करा. चरबीयुक्त पदार्थांच्या सेवनाने कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं आणि हृदयाला नीट रक्तपुरवठा होत नाही. 
				  				  
	 
	* शर्करायुक्त पदार्थ, पेस्ट्री, केक असे पदार्थ कटाक्षाने टाळा. या पदार्थांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	* जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार दिवसाला 1500 मिलीग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाणार्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता बरीच जास्त असते. त्यामुळे आहारात मीठाचं प्रमाण कमी ठेवा. 
				  																								
											
									  
	 
	* चरबीयुक्त पदार्थ, तळलेले पदार्थ टाळा. 
	 
	* हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पलंगावर पडून राहू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हालचाल करा. हलका व्यायामही करता येईल. 
				  																	
									  
	 
	* हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आपल्या आरोग्याकडे संपूर्ण लक्ष द्यायला हवं. वजन नियंत्रणात ठेवायला हवं. यासाठी खाण्या पिण्याच्या सवयी बदला. आरोग्यदायी आहार घ्या, फळं खा. 
				  																	
									  
	 
	* हृदयविकाराच्या झटक्यानंतर मधुमेह, उच्च रक्तदाब, हायपोथायरोडिजम अशा विकारांकडे दुर्लक्ष करू नका. या विकारांवर उपचार घ्या. 
				  																	
									  
	 
	* उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ताणतणाव तसंच गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्यानं रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. 
				  																	
									  
	 
	* हृदयविकाराच्या झटक्यानंतर औषधोपचार सुरू असताना थकवा, छातीत दुखणं, घाम येणं अशा समस्या निर्माण होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.