बद्‍धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर करण्यासाठी केवळ तीन सवयी बदला

बदलत असलेली जीवनशैली आणि कामाच्या धावपळीमुळे लोकं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. जवळपास 70 टक्के लोकं पोटात गॅसच्या समस्येमुळे परेशान आहेत. यामुळे पोटदुखी, डोकेदुखी किंवा मळमळ जाणवतं असते.
या प्रकाराची समस्या दूर करण्यासाठी लोकं गरम पाण्यात हिंग, ओवा आणि काळं मीठ घोळून पितात. या घरगुती उपायाने निश्चित आराम मिळतो पण तात्पुरता कारण या समस्यांसाठी मूळभूत कारण आहे आपली लाइफस्टाइल, तर जाणून घ्या कशा प्रकारे आपण यावर नियंत्रण ठेवू शकता-

1. बाहेर खाणे टाळा
कामाच्या व्यस्ततेमुळे आपण बाहेरचा आहार अधिक प्रमाणात घेत असाल तर हे टाळा. अनेक लोकांना बाहेरच्या खाण्याची चट देखील लागलेली असते परंतू दररोज मसालेदार, तेलकट, स्पाईसी, अती प्रमाणात कॅलरीजयुक्त आहार घेणे योग्य नाही. बाहेरचा अन्न पौष्टिक नसतं आणि स्वच्छतापूर्वक तयार केलेलं देखील नसतं. त्यात वापरलं जाणारं तेल आणि मसाले पचवण्यासाठी शरीराला अती मेहनत घ्यावी लागते आणि पचन दुरुस्त नसल्यास गॅसची समस्या उद्भवते.
2. चावून-चावून खा
आपण लहानपणी नेहमी ऐकलं असेल की प्रत्येक घास चावून-चावून खाल्ला पाहिजे. घाईघाईत जेवू नये. उभे राहून जेवू नये. किंवा टीव्ही बघत जेवू नये. पण खरंच या सवयी बदलल्या तर आरोग्यावर उत्तम परिणाम दिसून येतील. अनेक लोकं जेवण गिळून जातात कारण त्यांना घाई असते. धावपळीच्या या काळात किती जरी घाई असली तरी आहारासाठी योग्य वेळ देणे फारच गरजेचे आहे. कारण गिळलेलं अन्न पचवण्यासाठी शरीराला अधिक कष्ट घ्यावं लागतं. अशात तयार होऊ लागते. म्हणून कधीही आहार घेताना चावून-चावून खाणे अती आवश्यक आहे. हे काम घाईत करू नये.
3. मेडिसिन
औषधांचे सेवन केल्याने गॅस तयार होते. खरं म्हणजे प्रत्येक औषधांचे काही न काही साइड इफेक्ट्स असतात. अँटीबायोटिक घेतल्याने पोटाची पचन शक्ती दुरुस्त ठेवणारे 'गुड बॅक्टेरिया' ची संख्या कमी होते आणि यामुळे अन्न पूर्णपणे पचत नाही. पोट साफ नसल्यामुळे गॅस्ट्रिक ट्रबलला सामोरा जावं लागतं. अशात डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. डॉक्टर आपल्याला देत असलेल्या मेडिसिनचं साइड इफेक्ट्स कशा प्रकारे कमी करता येतील यावर सल्ला देऊ शकतात.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

निसर्गोपचार आणि त्याचे फायदे....

निसर्गोपचार आणि त्याचे फायदे....
निसर्गोपचार म्हणजे शरीराला कोणत्या प्रकाराची हानी न होऊ देता औषधोपचार करणे. आजच्या काळात ...

अॅमेझॉन कंपनीत नोकरीची संधी

अॅमेझॉन कंपनीत नोकरीची संधी
Amazon कंपनीने तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. यामध्अये र्धवेळ किंवा पूर्णवेळ ...

महिलानी आर्थिक आव्हानांना कशा प्रकारे सामोरे गेले पाहिजे

महिलानी आर्थिक आव्हानांना कशा प्रकारे सामोरे गेले पाहिजे
आयुर्विमा, आरोग्य किंवा मेडिक्लेम पॉलिसी, उत्पन्न संरक्षण योजना इत्यादींवर खर्च केलेल्या ...

शिवाजींची सहनशीलता

शिवाजींची सहनशीलता
एकदा छत्रपती शिवाजी अरण्यात शिकार करण्यासाठी चालले असत. थोडं पुढे वाढल्यास त्यांचा जवळ एक ...

अनेक गुणांचा खजिना आहे हे इवलेसे बोर.......

अनेक गुणांचा खजिना आहे हे इवलेसे बोर.......
बोर हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. चवीला आंबट, गोड, तुरट असणारे हे फळ ...