शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

आंब्यासोबत या पदार्थांचे सेवन केल्यास, शरीरात होईल विष तयार, जाणून घ्या कोणते आहे तीन पदार्थ

फळांचा राजा आंबा याची लोक आतुरतेने वाट पाहतात कारण हे फळ वर्षातून एकदाच येते. आंबा हा सर्वांनाच आवडतो. याची चव तर चविष्ट असते तसेच आरोग्यसाठी देखील फायदेशीर असतो. आंब्यामध्ये असलेले पोषक तत्व इम्युनिटी स्ट्रॉंग करतात. तसेच आजारांपासून रक्षण करतात. आंब्याच्या सेवनामुळे कँसर सारख्या भयंकर रोगापासून रक्षण होते. तसेच पाचनक्रिया सुधारते. पोषक तत्वांनी भरपूर असलेल्या आंब्याचे सेवन जर काही पदार्थांसोबत केले तर शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात तर चला जाणून घेऊ या कोणते आहे ते पदार्थ 
 
1. फळे- आंब्याला इतर फळाबरोर एकत्रित करून सेवन करू नये. नेहमी अनेक लोक फ्रुट चाट बनवतात. तसेच अनेक फळांना एकत्रित करून खातात . जर तुम्ही आंब्यासोबत मोसंबी, संत्री, लिंबू, केळे खात असाल तर आपली ही सवय बदला. कारण यामुळे तुम्हला आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागेल. 
 
२. दूध-  आपण नेहमी उन्हाळयात मँगोशेक सेवन करणे पसंद करतो. दुधासोबत आंब्याचे सेवन केल्यास पचन क्रिया खंडित होऊ शकते. तसेच मँगोशेक ने वजन जलद गतीने वाढते. 
 
3. आंबट आणि मसालेदार- आंबट आणि मसालेदार पदार्थ आंब्यासोबत सेवन केल्यास आपल्या शरीरात पित्त दोष निर्माण होऊ शकतो. तसेच गॅस, अपचन सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 
 
4 पाणी- आंब्यासोबत कधीही पाणी सेवन करू नये. ज्यामुळे तुम्हाला  पोटदुखी, अपचन, उल्टी, गॅस सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 
 
5. कारले- जर तुम्ही कारल्याची भाजी खात आहात. तर त्यासोबत चुकनही आंब्याच्या रसाचे सेवन करू नका. ज्यामुळे तुम्हाला पोटदुखी, गॅस, उल्टी या समस्या निर्माण होऊ शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
 
Edited By- Dhanashri Naik