मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 4 एप्रिल 2021 (13:05 IST)

पांढरे मीठ नाही,सेंधव मीठ फायदेशीर आहे जाणून घ्या

मीठ ही अशी गोष्ट आहे जी अन्नाची चव वाढवते. तर अन्नात जास्त झाल्यावर अन्नाची चव देखील खराब करते. कमी पडल्यावर देखील चव चांगली लागत नाही.  आपण पांढरे मीठ वापरतो .परंतु पांढरे मीठ हे शरीराला नुकसान देतो. या ऐवजी आपण सेंधव मिठाचा वापर करावा. याचे अनेक फायदे आहे.सेंधव मिठात कॅल्शियम,पोटेशियम,आणि झिंक सारखे घटक आढळतात. जे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 रक्तदाब - बीपी कमी झाल्यावर आपण लिंबूपाणी आणि मिठाचे घोळ पितो. या मध्ये पांढरे मीठ मिसळतो. जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. या ऐवजी आपण सेंधव मीठ वापरा. या मुळे आपले बीपी नियंत्रणात राहील. हृदयाचे विकाराची समस्या उद्भवणार नाही. तसेच कोलेस्ट्रॉल देखील वाढणार नाही. 
 
2 ताण असल्यास- याचा सेवन केल्याने ताण कमी होईल. या मध्ये उपस्थित सेरोटोनिन आणि मेलोटोनीन रसायनाचा संतुलन राखतो. हे नैराश्य सारख्या समस्येशी लढायला मदत जातो. 
 
3 वजन - आजच्या काळात प्रत्येक जण लठ्ठपणाला आहारी जात आहे. हे कमी करण्यासाठी विविध प्रयोग केले जात आहे. जर आपण अन्नात पांढऱ्या मीठा ऐवजी सेंधव मीठ वापराल तर वजन कमी होईल या मध्ये असलेले घटक अतिरिक्त चरबी कमी करण्यात मदत करतात. 
 
4 आजारापासून मुक्ती- याचे सेवन निद्रानाश,दमा,मधुमेह मुतखडा सारख्या समस्येसाठी प्रभावी आहे. 
 
5 सायनस- सायनस चा त्रास लहान मुलांना सर्वाधिक होतो. या साठी सेंधव मिठाचे सेवन करावे. याचे सेवन केल्याने श्वासाच्या आजाराचा धोका देखील टळतो.