आयुर्वेद : हे पदार्थ सोबत खाणे टाळा, त्रास होऊ शकतो
बऱ्याच लोकांची सवय असते की ते अन्नासह इतर खाद्य पदार्थांचा समावेश देखील आपल्या ताटात करतात पण असं करण्यापूर्वी हे माहित असू द्या की आयुर्वेदात कोणत्या गोष्टींना एकत्र खाण्यास नाही सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊ या कोणत्या गोष्टींना एकत्र खाऊ नये.
* दुधासह हे खाऊ नये -
उडीद डाळ, पनीर, अंडी, मांस उडीद वरण खाल्ल्यावर दूध पिऊ नये. हिरव्या पालेभाज्या आणि मुळा खाल्ल्यावर दूध पिऊ नये. अंडी, मांस आणि पनीर खाल्ल्यावर दूध पिऊ नये. हे एकत्ररित्या खाल्ल्याने पचनात अडचण येऊ शकते.
* दह्यासह हे खाऊ नये-
दह्यासह विशेषतः आंबट फळे खाऊ नये. दह्यात आणि फळात वेगवेगळे एंझाइम असतात. या मुळे ह्यांचे व्यवस्थितरीत्या पचन होत नाही, म्हणून हे दोन्ही एकत्र घेऊ नये.
* मासे -
दह्याची प्रकृती थंड आहे. ते कोणत्याही उष्ण पदार्थांसह घेऊ नये. मास्यांची प्रकृती उष्ण आहे, म्हणून ते दह्यासह खाऊ नये.
* मधासह काय खाऊ नये -
मध हे कधीही गरम करून खाऊ नये. ताप आला असल्यास मधाचे सेवन करू नये. या मुळे शरीरात पित्त वाढतो. मध आणि लोणी एकत्र खाऊ नये. तूप आणि मध एकत्र खाऊ नये. पाण्यात घालून देखील तूप आणि मध एकत्र घेऊ नये. या मुळे त्रास संभवतो.
या गोष्टींना एकत्ररित्या खाणे टाळा -
* थंड पाण्यासह तूप, तेल, खरबूज, पेरू, काकडी, जांभूळ आणि शेंगदाणे.
* खीर सह सातू, मद्य, आंबट आणि फणस खाऊ नये.
* भातासह व्हिनेगरचे सेवन करु नये.