मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (16:00 IST)

Liver Damage Signs यकृत खराब झाल्यामुळे ही सुरुवातीची लक्षणे शरीरात दिसतात, चुकूनही दुर्लक्ष करू नका

Liver Damage Signs आपल्या शरीरातील सर्व अवयव आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. यकृत हे या अत्यावश्यक अवयवांपैकी एक आहे, जे त्याच्या अनेक महत्त्वपूर्ण कार्यांसाठी ओळखले जाते. यकृत केवळ पचन आणि चयापचय सुधारत नाही तर पोषक तत्वांचा साठा करण्यासोबतच शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. अशा परिस्थितीत, यकृताची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरुन ते त्याचे कार्य योग्यरित्या करू शकेल.
 
मात्र सध्या झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे लोक अनेक समस्यांना बळी पडत आहेत. यकृत खराब होणे ही यापैकी एक समस्या आहे, ज्यामुळे आजकाल बरेच लोक त्रस्त आहेत. यकृत खराब झाल्यामुळे व्यक्तीला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी वेळीच ओळखले तर त्याचे गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात. या लक्षणांद्वारे तुम्ही यकृताचे नुकसान ओळखू शकता.
 
मळमळणे किंवा उलट्या होणे
जर आपल्याला उलट्या होत असतील किंवा जीव घाबरत असेल किंवा मळमळत असेल तर लिव्हरचा आजार होण्याचे लक्षण असू शकतात. याशिवाय स्टूलमध्ये रक्त किंवा रक्ताची उलटी होत असेल तर ते यकृत खराब झाल्याचे लक्षण असू शकते. ही लक्षणे दिसल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
 
पोटात सूज
क्रोनिक लिव्हर डिजीजमुळे तुमच्या पोटात द्रव साचू शकतो, ज्यामुळे तुमच्या पोटाच्या आकारात अचानक बदल होतो. पोटाचा विस्तार किंवा आकार वाढणे हे देखील यकृताच्या नुकसानीचे लक्षण असू शकते.
 
त्वचेची खाज
त्वचेची खाज लिव्हरच्या आजाराचे सामान्य लक्षणांपैकी एक आहे. हे ऑब्ट्रक्टिव कावीळचे संकेत असू शकतात. या व्यतिरिक्त हे बाइल डक्टमध्ये स्टोन, बाइल डक्ट किंवा स्वादुपिंडाचा कर्करोग, प्रायमरी बाइलरी सिरोसिस मुळे देखील असू शकते.
 
झोपेत कमी
जर तुम्हाला झोपेशी संबंधित समस्या येत असतील तर एकदा नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधा. यकृत शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्याचे काम करते, परंतु जर ते खराब झाले तर हे विष रक्तात जमा होऊ लागते, ज्यामुळे झोपेचे चक्र बिघडू शकते. यकृत सिरोसिसचे रुग्ण अनेकदा झोपेचा त्रास, विशेषत: दिवसा झोपेची आणि निद्रानाशाची तक्रार करतात.
 
पायात सूज
क्रोनिक लिव्हर डिजीजमध्ये तुमच्या पायांमध्ये द्रव साचू शकतो. त्यामुळे पाय फुगतात. जर तुम्हाला तुमच्या पायात विनाकारण सूज आल्याचे दिसले तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.