testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मोड आलेल्या मेथीचे आरोग्यलाभ

medhi sprouted
Last Updated: सोमवार, 3 सप्टेंबर 2018 (10:51 IST)
कोणतेही मोड आलेले कडधान्य शरीराला उपयु्रत ठरते. डॉक्टर सांगतात की, कडधान्ये खा. किंवा मोड आणून त्याची भेळ करुन खा. ही टेस्टी भेळ खाण्यास मजाही येते आणि लहान मुले तर यामुळे निरोगी राहतात. त्यात मेथी हा प्रकार तर हेल्दी आहे. आणि मोड आणलेली मेथी म्हणजे दुधात साखर. इतका उत्तमआणि निरोगी पदार्थ आहे.
मोड आलेली मेथी फायदेशीर असते. मधुमेहाच्या आजार कमी करण्यासाठी ही उपयुक्त ठरते. वजनाची चिंता असणार्‍यांना मोड आलेले पदार्थ विशेष फायद्याचे ठरतात. दिवाळी होऊन गेली की प्रत्येकाला वाढणार्‍या वजनाची, ब्लडप्रेशरची आणि कोलेस्टेरॉलची काळजी वाटू लागते गोड पदार्थ खाण्याचा मोह कुणाचा सुटत नाही परिणाम वजन वाढते. मग ते कमी करण्यासाठी अट्टहास सुरु होतो. यावर उपाय म्हणजे मेथी. मेथीचे लाडू बाळंतिणीसाठी आरोग्यदायी असतात. बाळंतिणीला मेथीचे लाडू देतात. पण मेथीचे लाडू कडू लागतात. म्हणून सगळे खायला काचकूच करतात. मेथीला मोड आणले आणि ती वेगवेगळ्या पदार्थांत वापरली तर कडू लागत नाही आणि फायदाही होतो. मोड आलेल्या मेथीचे पुष्कळ फायदे आहेत.
* वजन कमी करण्यास मदत होते.
* मधुमेह नियंत्रणात राहातो.
* कोलेस्टेरॉल कमी होते.
* पचनास मदत होते.
* छातीतील जळजळ कमी होते.
* काही प्रकारच्या कर्करोगांमध्ये उपयु्रत.
* बाळंतिणीचे दूध वाढते. यासाठी मेथीचे लाडू किंवा हळीवाचे लाडू देतात.
* महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मेथी उपयु्रत ठरते.
* यामध्ये भरपूर लोह असल्याने महिलांसाठी फायदेशीर ठरते.
* सौंदर्य प्रसाधन म्हणूनही मेथीचा वापर केला जातो.
* केसांच्या समस्येवर मेथी उपयु्रत ठरते. मेथ्या मिक्सरला लावून दह्यामध्ये रात्री भिजत घालावे. केसांना अर्धा तास मॉलिश करावे. अर्धा तासाने केस धुतल्यास केस तजेलदार आणि चमकदार दिसतात.
शैलेश धारकर


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

एक डाव नियतीचा?

national news
मिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून ...

तुम्हांला बालदिनाच्या शुभेच्छा ! !

national news
आईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...

बीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...

national news
हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...

आश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे

national news
कोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...

झेंडूची फुले ही आहे गुणकारी

national news
दोन दिवसांत जखम सुकून बरी होते. अशाप्रकारे झेंडूची फुले औषधी आहेत. म्हणूनच त्यांना हिंदू ...