बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

कब्ज आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्ची केळी आहे फायदेशीर

पिकलेले केळी तर आपण खातोच आणि आपल्याला हे माहीत आहे की हे किती फायदेशीर आहे, पण कच्च्या केळीचे फायदे आपल्याला ठाऊक आहेत का? कच्च्या केळींचे हे 5 फायदे जाणून घ्या.
 
1. भरपूर पोटॅशियम असल्याने कच्ची केळी आपल्याला पुरेसे व्हिटॅमिन आणि अँटिऑक्सीडंट देतात. हे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि आणि दिवसभर आपल्याला अक्टिव ठेवण्यास मदत करतात.  
2. कब्ज्याचा त्रास असल्यास कच्ची केळी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. त्यात असलेले फायबर आणि स्टार्च
आतड्यांमध्ये संक्रमण रोखण्यास मदत करतो ज्याने पोट साफ राहत.
3. पचन प्रक्रिया बरोबर ठेवण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. याचे सेवन केल्याने पचन रसांचा स्राव चांगल्या प्रकारे होतो आणि पचन प्रक्रिया योग्य राहते.
4. कच्च्या केळींमध्ये असलेले कॅल्शियम हाड मजबूत करण्यात मदत करतो आणि गुडघ्यासंबंधी समस्या टाळण्यास मदत करतो.
5. मधुमेह टाळण्यासाठी, कच्ची केळी फायदेशीर आहे. हे  बर्याच वेळेपर्यंत भुकेला देखील नियंत्रित ठेवतात, ज्यामुळे  आपण ओवर ईटिंग किंवा वाईट खाण्याची सवय टाळू शकता.