शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2019 (10:56 IST)

साखरेमुळे होणारे 5 नुकसान माहित आहे का ?

साखर आमच्या जीवनातील अविभाज्य अंग आहे. आणि याचा गोडवा जितका हवा हवासा वाटतो तेवढेच याचे नुकसानही आहेत. जर आपल्यालाही साखर खाण्याची सवय असेल तर यापासून होणारे पाच नुकसान जाणून घ्या:
 
मधुमेह- आपल्या परिवारात कोणालाही डायबिटीज असल्यास आपण साखर कमी करावी. कारण की अनुवांशिक रूपात याचे सेवन मधुमेहाचे कारण बनू शकतं.
 
खाज- साखरेची अतिरिक्त मात्रा सेवन केल्याने गुप्तांगामध्ये खाज सुटण्याची तक्रार होते. याने गुप्तांगाहून अत्यधिक तरल स्त्राव आणि संक्रमण होण्याची शक्यताही असते.
 
हृदय रोग- अधिक साखरेमुळे हृदय नलिकेत चरबी जमा होऊन ती ब्लॉक होण्याची शक्यता असते. याने हार्ट अटॅकची शक्यता वाढते.
 
इसब- त्वचेवर अधिक साखर सेवन केल्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. एका संशोधनाप्रमाणे साखरेमुळे इसब होण्याची शक्यता वाढते.
 
कमजोर हाडं- साखरेमुळे हाडं कमजोर होतात आणि ऑस्टिओपोरोसिस रोग होण्याची शक्यता असते.