Health Tips: वर्कआउट आधी खायला पाहिजे हे 5 फूड  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  प्रत्येक वर्षी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरपर्यंत नॅशनल न्यूट्रिशन वीक साजरा करण्यात येतो. याचे मुख्य उद्देश्य चांगल्या आरोग्यासाठी योग्य खान पानाबद्दल लोकांना जागरूक करणे आहे. जर गोष्ट वर्कउटची केली तर वर्कआउट करण्याअगोदर योग्य खान पानाबद्दल देखील माहीत असायला पाहिजे. खास करून एक्सरसाइज करण्याअगोदर पोषक तत्त्व असणार्या वस्तूंचे सेवन केलं पाहिजे ज्याने तुम्हाला वर्कआउटसाठी ऊर्जा तर मिळेलच तसेच तुमचे आरोग्य देखील चांगले राहील. येथे आम्ही तुम्हाला 5 असे  पोषक तत्त्वांबद्दल सांगत आहोत : 
				   
				   
		 
		केळी : केळीत पोटॅशियम बर्याच प्रमाणात असत जे तुमच्या स्नायूंच्या क्रियेसाठी गरजेचे आहे. हे तुमच्या शरीराला वर्कआउट करण्यासाठी गरजेचे कार्बोहाइड्रेट बी देतो. 
 
				  
		
आंबा : आंबा तुमचे अॅनर्जी लेवल फारच कमी वेळेसाठी वाढवतो. त्याशिवाय यात व्हिटॅमिन मिनिरल आणि अँटीऑक्सीडेंट असत.
		
 
				  
	 
	ओटमील आणि ब्लूबॅरिज : या दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये तुमच्या बॉडीला प्रोटीन मिळत जे वर्कआउटदरम्यान तुमच्या स्नायूंना स्पोर्ट करतो.    
				  				  
	
				   
				  
	लो फॅट चीज विथ एप्रीकॉट : यात दुधाचे प्रोटीन आणि ताक प्रोटीन असत. दुधाचे प्रोटीन जेथे पचवण्यास वेळ लावतो तसेच शरीराला दीर्घकाळासाठी ऊर्जा देतो. त्याशिवाय एप्रीकॉट व्हिटॅमिनचा चांगला सोर्स आहे आणि हृदय व हाडांसाठी देखील फायदेशीर आहे.     
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	
				   
				  
	अंडी आणि एवोकेडो : जर तुमची भूक चांगली असेल तर प्रोटिनासाठी तुम्ही अंडी खाऊ शकता. यामुळे तुमचे पोट भरलेले राहील आणि वर्कआउटसाठी तुम्हाला पूर्ण ऊर्जा मिळेल.