सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

वजन कमी करायचं असेल तर लंच घ्या 3 वाजेआधी

एका शोधाप्रमाणे दुपारी तीन वाजेनंतर लंच करणार्‍यांमध्ये वजन कमी होण्याची प्रक्रिया हळू होत जाते.
 
निरोगी राहण्यासाठी हेल्दी फूडचे सेवन करणे आवश्यक आहे, विशेषकर त्या लोकांसाठी जे वजन कमी करू इच्छित आहेत. कमी वेळात वजन कमी करण्याची इच्छा असल्यास आपल्या योग्य आहाराबद्दल माहिती असणे गरजेच आहे सोबत आहार सेवन करण्याची योग्य वेळ देखील माहीत असावी. अनेकदा कामाच्या घाईत, वेळ मिळत नसल्यामुळे अनेक लोकं उशिरा लंच घेतात. आणि हीच सवय वजनावर भर घालते.
 
दुपारच्या जेवण्याची वाईट वेळ कोणती?
एका शोधाप्रमाणे दुपारी तीन वाजेनंतर आहार सेवन केल्याने वजनी कमी होण्याची गती हळू होते. सर्व्हेत कळून आले की उशिरा जेवण करणार्‍यांचे इतर मेहनतीनंतर देखील वजन कमी होत नव्हतं. या शोधात विशेषकरून जेनेटिक असणार्‍या लोकांना सामील केले गेले. 
 
वेळेवर जेवण का आवश्यक?
इंटर्नल क्लॉक सर्केडियन रिदम शरीराची झोपण्याची आणि उठण्याची सायकल रेगुलेट करते. इंसुलिन हार्मोनवर देखील याचा प्रभाव पडतो. आणि शरीरात इंसुलिन सेंसिटिव्हिटी लो झाल्यावर वजन कमी करणे अवघड होऊन बसतं. 
 
खाण्याची योग्य वेळ कोणती? 
दररोज खाण्याची एक योग्य वेळ ठरवावी ज्याने शरीराला त्याची सवय होते आणि शरीराची सर्केडियन क्लॉक योग्य रित्या काम करते. योग्य वेळी जेवल्याने मेटाबॉलिझ्म, लठ्ठपणा आणि स्लिप सायकल योग्य रित्या काम करते म्हणून वजन कमी करू इच्छित असाल तर योग्य वेळी आहार घेणे योग्य ठरेल.