गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑक्टोबर 2024 (07:30 IST)

अल्कोहोल मसाज म्हणजे काय, फायदे जाणून घ्या

Alcohol massage benefits: अल्कोहोलचे अती सेवन आरोग्यासाठी नुकसानदायक असतं, परंतू याची मसाज आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. जाणून घ्या याचे 5 सर्वोत्तम फायदे

* शारीरिक मेहनतीनंतर स्नायूंमध्ये होणार्‍या वेदना अल्कोहोल मालिशने दूर होतात. वेदना होत असलेल्या भागावर मसाज करून तासाभरासाठी तसेच राहू द्या नंतर धुऊन टाका.
 
* त्वचा किंवा नखांवर होणार्‍या बुरशीवर हे खूप प्रभावी आहे. कापसाचा बोळा यात बुडवून संबंधित भागावर लावा आणि वाळेपर्यंत तसेच राहू द्या. धुण्याची घाई करू नका.
 
* हलक्या जखमेवर अल्कोहोलचा प्रयोग केल्याने जखम लवकर बरी होते. हे संबंधित भागेवर अँटीबायोटिकप्रमाणे काम करेल आणि जखम लवकर बरी करण्यात मदत करेल.
 
* केवळ त्वचा नव्हे तर केसांमध्येही याची मसाज केल्याने फायदा मिळू शकतो. बियर केसांना नरम आणि चमकदार बनविण्यात मदत करते.
 
* उष्णतेसाठी अल्कोहोल मसाज फायदेशीर आहे. याने मसाज केल्यावर आपल्याला त्वचेत उष्णता जाणवेल.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit