शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

कान टोचण्याचे फायदे

अनेक जाती धर्मात मुलांचे कान टोचण्याची परंपरा असून अनेक जागी याचा मोठा सोहळा असतो तर कुठे केवळ एक परंपरा म्हणून याचा निर्वाह केला जातो. या संस्कारात लहानपणीच मुलांचे कान टोचले जातात. आता हा प्रकार फॅशन बनला असला तरी यामागे आरोग्यासंबंधी फायदे आहे. कानामध्ये प्रेशर लागल्याने सर्व नसां ऍक्टिव होऊन जातात. असेच पाहू कान टोचण्याचे काही फायदे:
मेंदूचा विकास: कानाच्या खालील भागात मेंदूशी जुळणारा एक बिंदू असतो. जेव्हा हा बिंदू टोचला जातो तेव्हा मेंदूचा विकास होता. म्हणूनच लहानपणीच कान टोचण्याची परंपरा आहे.
 
दृष्टी सुधारते: अॅक्युपंक्चरप्रमाणे, कानाच्या खालील भागात केंद्रीय बिंदू आहे, हा बिंदू दाबल्यास दृष्टी सुधारते.

स्पष्ट ऐकू येतं: कान टोचल्याने स्पष्ट ऐकू येतं.
 
लठ्ठपणा कमी होतो: कान टोचण्याने पचन क्रिया सुरळीत राहते आणि त्यामुळे लठ्ठपणा वाढण्याची शक्यता कमी होते.

ताणापासून मुक्ती: अॅक्युपंक्चरप्रमाणे, कान टोचवल्यावर त्या बिंदूवर पडणार्‍या दबावामुळे काळजी करणे, गोंधळणे, व इतर मानसिक रोगांपासून मुक्ती मिळते.
 
पुनरुत्पादक अवयव राहतात निरोगी: कान टोचल्यावर पडणार्‍या प्रेशरमुळे पुनरुत्पादक अवयव निरोगी राहतात.

एकाग्रता वाढते: कानात छिद्र केल्याने मेंदूची शक्ती वाढते आणि त्यामुळे एकाग्रता वाढते. हेच कारण आहे की मुलांचे शिक्षण सुरू होण्याआधी त्यांचे कान टोचवले जातात.
अर्धांगवायू टाळणे: वैज्ञानिक दृष्टीने कानात छिद्र केल्याने अर्धांगवायू टाळण्यात मदत मिळते.
 
पुरुषांना लाभ: पुरुषांच्या वीर्य संवर्धनातदेखील याने लाभ मिळतो.