गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

जिम जाताय.... तर लक्षात ठेवा

* जिमिंग सुरू करण्याआधी आणि जिमिंग झाल्यानंतर लगेच पाणी किंवा ज्यूस पिणे टाळा.
 
* आपण किती कॅलरीज कमी करतोय किंवा घेतोय याचा हिशोब असू द्या.
 
* वजन कमी करण्यासाठी किंवा फिटनेससाठी लहान-लहान लक्ष्य निर्धारित करा.
 
* ट्रेनरचा सल्ला घेतल्याशिवाय दुसर्‍यांना पाहून कोणतीही नवीन मशीन ट्राय करू नका.

* जिमसाठी योग्य तेच कपडे आणि जोडे निवडा.
 
* जिममध्ये घाम पुसण्यासाठी नेहमी स्वच्छ नॅ‍पकिन वापरा.
 
* कोणतीही मशीन वापरण्यासाठी नीट प्रशिक्षण घ्या आणि क्षमतेहून अधिक वर्कआउट टाळा.

* एखाद्या व्यायामाने आपले अंग दुखत असेल किंवा स्नायू खेचले जात असतील तर लगेच तो व्यायाम बंद करा.
 
* कोणत्याही कंपनीचे प्रोटीन शेक किंवा एनर्जी ड्रिंक सेवन करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
 
* जर आपल्याला एखादे संक्रमण किंवा रोग असेल तर आधीचं त्याची माहिती जिम ट्रेनरला द्या.