बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

वर्कआउट नंतर ह्या चुका करू नये

आम्ही सर्व आमच्या शरीराला फिट ठेवण्यासाठी रोज वर्कआउट करतो पण तुम्ही हे योग्यरीत्या कराल तरच त्याचा फायदा मिळवू शकता. जास्तकरून लोक वर्कआउट दरम्यान काही अशा चुका करतात ज्यामुळे या वर्कआउटचे शरीराला फायदा होण्याबदले नुकसानच जास्त होतात. म्हणून जरूरी आहे की या चुकांना ओळखून त्या सुधारण्याचा प्रयत्न करावा. तर जाणून घेऊ वर्कआउटच्या वेळेस लोक काय चुका करतात.  
 
1. ऐकाऐक व्यायाम बंद करणे  
जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा शरीराच्या तापमानाबरोबर रक्त संचार आणि हृदयाचे ठोके वाढतात, जे सामान्य होण्यासाठी थोडा वेळ लागतो. म्हणून एकदम व्यायाम करणे सोडायला नको, हळू हळू व्यायाम करत शरीराला पहिल्या स्थितीत आणावे.  
 
2. स्ट्रेच न करणे 
जेव्हा तुम्ही वर्कआउटनंतर शरीराला स्‍ट्रेच करत नाही तर स्नायूंमध्ये बर्‍याच प्रकारच्या समस्या आणि थकवा येतो. म्हणून वर्कआउट नंतर शरीराला स्ट्रेच करणे विसरू नका.  
 
3. व्यायामानंतर न खाणे
वर्कआउट नंतर काही न काही नक्की खा, याने स्नायूंची मरम्‍मत होते. तुम्ही दही, ब्‍लूबेरी किंवा मुट्ठीभर सुके मेवे खाऊ शकता.   
 
4. कपडे चेंज न करणे  
जेव्हा तुम्ही वर्कआउट करता त्याच्यानंतर कपडे जरूर चेंज करा. कारण व्यायाम करताना घाम येतो, ज्याने यीस्ट संक्रमण होऊ शकत.  
 
5. शॉवर ना घेणे  
वर्कआउटनंतर शॉवर न घेतल्याने व्यायाम दरम्यान घाम वाळल्याने जिवाणूंचे आक्रमण होण्याची शक्यता असते.