Creak Heel Tips : भेगा पडलेल्या टाचांपासून सुटका मिळविण्यासाठी फक्त 1 सोपी टिप...
टाचांमध्ये भेगा पडणं हे सामान्य आहे, पण ह्याचा त्रास वेगवेगळा होऊ शकतो. काही लोकांमध्ये हे सामान्यरीत्या उद्भवते तर काही लोकांमध्ये वेदनादायक जखमेचे स्वरूप घेतं.परंतु दोन्ही प्रकरणात पायाचे आणि टाचेचे सौंदर्य हरवून घेतं.
जर आपल्यालाही हा त्रास असल्यास आणि बरेच उपाय करून दमला आहात, तर हा 1 उपाय आपल्या त्रासाला कमी करू शकतं. जाणून घेऊ या याचे कारण आणि रामबाण औषध.
कारणं - शरीरात उष्णता किंवा कोरडेपणा वाढतो, अनवाणी चालणे, रक्ताची कमतरता, हिवाळ्यामुळे आणि धूळ मातीमुळे टाचांना भेगा पडतात आणि काळजी न घेतल्यास अधिकच फाटतात आणि त्यामधून रक्तस्त्राव होतो आणि हे फार दुखतात.
उपाय - आमसुलाचे तेल 50 ग्रॅम, मेण 20 ग्रॅम,स्वर्णक्षीरी किंवा कटुपर्णीच्या बियाणांची भुकटी 10 ग्रॅम आणि साजूक तूप 25 ग्रॅम. सर्व मिसळून एकजीव करून बाटलीत भरून ठेवा. झोपताना पायाला स्वच्छ धुऊन पुसून हे औषध भेगांमध्ये भराव आणि मोजे घालून झोपावं. काहीच दिवसात भेगा नाहीश्या होतील, तळपाय स्वच्छ, नरम होतील. त्रिफळा चूर्ण घेऊन त्याला खाद्यतेलात भाजून घ्यावे आणि ते मिश्रण झोपताना भेगांमध्ये लावले तर काहीच दिवसात भेगा नाहीश्या होतात.