शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

जाणून घ्या बडीशेपेचे बडे लाभ

मुखशुद्धीसाठी बडीशेप खाल्ली जाते पण आरोग्यासाठीही बडीशेप उपयुक्त ठरते. बडीशेप आणि खडीसाखर एकत्र करून खाल्ल्यास पोटाच्या तक्रारी कमी होतात.

कोमट पाण्यासवे बडीशेप घेत ल्यास गॅसेसची समस्या नाहीशी होते. बडीशेप, खडीसाखर आणि बदाम मिक्सरमध्ये एकत्र वाटू घ्या. दररोज रात्री एक चमचा या प्रमाणात हे मिश्रण खा आणि कपभर दूध घ्या. हा उपाय डोळ्यांचं आरोग्य जपण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं.

बडीशेपमध्ये पोटॅशियमची विपूल मात्रा असल्यामुळे रक्तप्रवाह संतुलित राहतो. भूक मंदावणं, पोट फुगणं, गॅसेस होणं आदी समस्यांवर भाजलेली बडीशेप खाणं हा रामबाण उपाय आहे.

बडीशेपेच्या नित्य सेवनामुळे अनावश्यक चरबी जळते, चयापचय क्रिया वेग घेते. वजन कमी करण्यासाठी बडीशेप आणि काळ्या मिरीचं एकत्रित सेवन परिणशमकारक ठरतं.