शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

चिकनगुनिया आणि डेंग्यू: पपईच्या पानांचा रस फायदेशीर

चिकनगुनिया झाल्यावर डॉक्टरांचा औषध तर नियमाने घेयलाचं हवं त्याबरोबर घरगुती उपाय केले तरी त्याचे काही साइड इफेक्ट्स नसतात वरून त्याने रोगावर नियंत्रण करण्यात मदत होते.
पपईच्या पानांचा रस: डेंग्यू आणि चिकनगुनिया मध्ये पपईच्या पानांना उकळून पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. काही लोकं याचा रस पिण्याचाही सल्ला देतात. पपईच्या पानांमध्ये आढळणारे एंजाइम प्लेटलेट काउंट्स वाढवण्यात मदत करतात.
 
ओवा: ओव्यात थीमोल नावाचे तेल आढळतं. हे लोकल एनेस्थिसिया सारखे काम करतं. ज्यामुळे वेदना कमी होतात. यात अँटी-बॅक्टीरियल आणि अँटी-फंगल गुण ही आढळतात. यात आढळणारे अँटी-ऑक्सीडेंट इम्यून सिस्टमला बूस्ट करण्याचे काम करतात.

तुळशीचे पाने: तुळशीच्या पानांमध्ये विविध प्रकाराचे तेल आढळतात जे सर्वोत्तम तापरोधी आहे. याव्यतिरिक्त यात आढळणारे एंजाइम्स कमजोरीत राहत देतात. यातील अँटी-ऑक्सीडेंट आणि बीटा-कॅरोटीन इम्यूनिटीला बूस्ट करण्याचे काम करतं.
लसूण: लसूण मसालेदार पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलं तरी यात खूप औषधी गुणदेखील आहेत. लसुणामध्ये न्यूट्रिएंट्स, मिनरल्स, व्हिटॉमिन आणि अँटी-ऑक्सीडेंट आढळतं. लसूण अँटी-व्हायल सारखे काम करतं.
 
शेवग्याचा शेंगा. डेंग्यू आणि चिकनगुनिया मध्ये शेवग्याच्या शेंगांचा सूप पिण्याचा सल्ला दिला जातो. शेंगांसोबतच शेवग्याचे पानेदेखील फायदेशीर असतात. या शेंगा व्हिटॉमिन ए चा सर्वोत्तम स्रोत आहेत. याव्यतिरिक्त व्हिटॉमिन बी6 आणि बी1 प्राप्त करण्याचा उत्तम स्रोत आहे. याने शरीराला ताकद मिळते आणि स्नायू मजबूत होतात.