सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: सोमवार, 13 फेब्रुवारी 2023 (13:35 IST)

Home Remedies अँसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

अँसिडिटीपासून सुटका हवी असल्यास वेलची अत्यंत फायद्याची आहे. त्यासाठी वेलची चावून चावून खाणे किंवा चघळणे अत्यंत चांगले. त्यातून निघणारे तेल तोंडातील लाळेच्या ग्रंथीत मिसळल्याने पोट साफ होते व चांगली भूक लागते.
गर्भवती स्त्रीने गर्भकाळामध्ये संत्रच्या रसाचा उपयोग केल्यास गर्भातील शिशू स्वस्थ, सुडौल आणि सुंदर त्वचेचा होतो.
डोळ्यांसाठी वेलची अत्यंत गुणकारी आहे. वेलचीचे चूर्ण व साखर समप्रमाणात घेऊन तसेच एरंडेल घेऊन सुमारे चार मासे दररोज सकाळी प्यावे, त्याने डोळ्याची अतिरिक्त उष्णता कमी होऊन डोळ्यांचे तेज वाढते.
सर्दीने नाक गच्च व डोके जड झाल्यास सुंठीच्या पाण्यात/दुधात उगाळलेला लेप कपाळाला लावल्यास उपोयग होतो. खोकला आल्यास हळद आणि आल्याच्या काढ्यात मध मिसळून घेतल्यास फरक पडतो.
उडदाची डाळ वाटून तुपात भाजावी. त्यात गूळ, सुंठ वाटून मिसळून लाडू तयार करावे. दररोज एक लाडू खाल्ल्याने पक्षाघात (अर्धांगवायू) बरा होतो.