गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

भूक वाढविण्यासाठी हे करून बघा

काही लोकांना नीट भूक लागत नाही. त्यामुळे असे लोक वेळेवर जेवत नाहीत. त्यामुळे अशक्तपणा येऊ लागतो. 
* काळ्या मिठाने गॅसेसची समस्या कमी होते आणि भूक वाढते. पोटही साफ राहते.
 
* हिरड्याचे चूर्ण, सुंठ, गूळ, सैंधव मीठ एकत्र घेतल्यानेही ही समस्या दूर होते.
 
* सैंधवमीठ, हिंग, ओवा आणि त्रिफळा हे सर्व समप्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण करावे. चूर्णाएवढाच गूळ त्यात मिसळावा आणि त्याच्या छोट्या गोळ्या कराव्यात. जेवणानंतर एक-दोन गोळ्या घ्याव्यात.
 
* सफरचंदान भूक वाढून रक्त शुद्धी होते.
 
* हिरडा कडूनिंबाच्या निंबोण्यांबरोबर खाल्ला तर भूक वाढते. त्वचा रोग नाश होतो.
 
* हिरडा, गूळ, सुंठ यांचे चूर्ण करून थोड्या प्रमाणात ते मठ्ठ्याबरोबर घ्यावे.
 
* सुंठीचे चूर्ण तुपात मिसळून गरम पाणी प्यायल्यास चांगली भूक लागते.
 
* रोज जेवण करण्याआधी आल्याला सैंधव मीठ लावून खाल्ल्यास भूक वाढते.
 
* गव्हाच्या कोंड्यामध्ये सैंधव मीठ आणि ओवा घालून त्याची पोळी बनवून खावी त्यामुळेही ही समस्या दूर होते.
 
साभार : डॉ. संतोष काळे