गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

Try This : घरचा वैद्य

चेहऱ्याव्रील व अंगावरील लव कमी होण्यासाठी पपिता पावडर, नीमा पावडर, मंजिष्ठा समप्रमाणात घेऊन त्यात पाव चमचा आंबेहळद टाकणे व त्याच्या चार पट मसूर डाळीचे पीठ टाकणे. कच्चा दुधात पेस्ट करून केसांच्या उलट्या दिशेने लावावे. पीठी ज्याप्रमाणे काढतो त्याप्रमाणे चोळावे नंतर साय / लोणी लावणे. कोल्ड क्रीम लावणे.

१) म्हसूर डाळ आर्धा किलो
२) आंबे हळद तोळा
३) गुलाब पावडर ५० ग्रॅम
४) संत्र्याची साल ५० ग्रॅम
५) चंदन पावडर ५० ग्रॅम
६) कडूलिंबाच्या पानाची पावडर
७) वाळा ५० ग्रॅम
८) मुलतानी माती ५० ग्रॅम
९) पपई पावडर ५० ग्रॅम
हे सर्व मिक्स करुन बरणीत भरुन ठेवावे. पाहिजे तेवढे उटणे घेऊन कच्चा दुधात पेस्ट करणे व ती सर्व अंगास लवुन आंघोळ करणे. ज्यांची कोरडी त्वचा असेल, हिवाळ्यात अंगाची फार खाज सुटत असेल तर त्यांनी हे मिश्रण लावुन आंघोळ करावी. फार चांगले असते.

चेहरा स्वच्छ व चमकदार होण्यासाठी एक चमचा त्रिफळा चूर्ण, १० मिनिट पाण्यात भिजवून चेहऱ्यावर लेप देणे.
चेहऱ्यावर सुरुकुत्या असेल तर त्यावर केशर व बदामची कच्च्या दुधात पेस्ट करुन लावणे.

केस गळत असेल तर एक मध्यम आकाराचे डाळींब सालीसकट मिक्सरमध्ये बारीक करणे. जास्वंद फुल, १०-२० ब्राम्हीपाने, १ चमचा आवळा पावडर, मेहंदी पाने अंदाजे हे सर्व बारीक करून २०० ग्रॅम तिळाच्या तेलात लोखंडीच्या कढईत मंद गॅसवर तडतड येईपर्यंत गरम करून कोमट असतानांच एका बाटलीत भरुन ठेवावे व ते केसांना लावावे.

जांभळीची बी पिंपल्सवर लावणे.

डोक्यात उवा झाल्यास सीताफळ बीची पावडर तेलात मिक्स करुन केसांच्या मुळांन लावणे. तेल लावतांना डोळ्यात जाणार नाही याची काळजी घेणे.