गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (10:06 IST)

Immune System मजबूत करतं तुळशीचा चहा

साहित्य -
500 ग्रॅम तुळशीची पाने (सावलीत वाळवलेले), 250 ग्रॅम शोप, 150 ग्रॅम वेलचीचे दाणे, 250 ग्रॅम रक्त चंदन, 25 ग्रॅम काळीमिरी, 50 ग्रॅम दालचिनी, 100 ग्रॅम तेजपान, 25 ग्रॅम बनफशा, 100 ग्रॅम ब्राह्मी बूटी.
 
कृती - 
सर्व साहित्ये खलबत्त्यात दरीदरीत कुटून घेणे सर्व साहित्ये मिसळून एका बरणीत भरून ठेवणे. तुळशीचा चहा मसाला तयार आहे.
 
किती वापरावे- 
2 कप चहा साठी हे मिश्रण 1/2 चमचा घेणंच पुरेशे आहेत.
 
चहा बनविण्याची कृती -
सर्वप्रथम 2 कप पाणी एका पातेलीत घालून उकळण्यासाठी ठेवा. पाणी उकळल्यावर पातळी गॅस वरून खाली काढून 1/2 चमचा मसाला घालून झाकून ठेवणे. थोड्या वेळ उकळी घ्या, चहा एका कपात गाळून घ्या. तयार आहे आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठीचा तुळशी चहा.   
 
टीप : आपल्याला तुळशीचा चहा गोड हवे असल्यास पाणी उकळवताना आपल्या चवी प्रमाणे साखर घालून गरम होण्यासाठी ठेवा, कारण या चहामध्ये दूध वापरले जात नाही.