testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पंडित जवाहरलाल नेहरू

Nehruji
NDND
स्वतंत्र आणि सहा वेळा कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेलेल्या पंडित नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर १८८९ मध्ये एका सुखवस्तू कुटुंबात झाला.

हॅरो व केंब्रिज येथे शिक्षण घेतल्यानंतर १९१२ मध्ये नेहरूंनी बॅरिस्टर ही पदवी घेतली. पण भारतात परतल्यानंतर काय करायचे असा संभ्रम त्यांना पडला होता. त्यावेळी त्यांना गांधीजी भेटले. त्यांनी दिलेल्या गुरूमंत्राने नेहरूंच्या विचारांची दिशाच बदलली. वडिलांची चांगली चाललेली प्रॅक्टिस त्यांना वारसा म्हणून मिळत होती. मात्र, नेहरूंनी त्याकडे पाठ फिरवून स्वातंत्र्याच्या आंदोलनात उडी घेतली.

१९१२ मध्ये ते कॉंग्रेसशी जोडले गेले. १९२० मध्ये प्रतापगड येथे शेतकर्‍यांचा मोर्चा त्यांनी काढला. १९२८ मध्ये सायमन कमिशनविरोधात निदर्शने करताना ते जखमी झाले. १९३० मध्ये मीठाच्या सत्याग्रहात त्यांना अटक करण्यात आली. सहा महिने ते तुरूंगात होते. १९३५ मध्ये अल्मोडा तुरूंगात असताना त्यांनी आत्मचरित्र लिहिले. आयुष्यात एकूण नऊ वेळा ते तुरूंगात गेले.

Nehruji
ND
१९४२ मध्ये मुंबईत कॉंग्रेसच्या बैठकीत त्यांनी जोरदार भाषण केले. त्याचवेळी गांधीजींना करा वा मरा चा नारा दिला. दुसर्‍याच दिवशी नेहरूंसह सर्व प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. त्यावेळी नेहरूंसह काही नेत्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले होते. तेथेच नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला.

पुढे स्वातंत्र्य आंदोलन यशस्वी ठरून देश स्वातंत्र्य होताच, पंतप्रधानपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडली. २७ मे १९६४ मध्ये त्यांचे निधन होईपर्यंत ते त्या पदावर होते. लोकशाहीला मजबूत करणे, देश आणि घटनेतील धर्मनिरपेक्ष छबी प्रस्थापित करणे आणि भारताच्या विकासात दीर्घकालीन फायद्याच्या ठरतील अशा योजना राबविणे हे त्यांच्या कार्यकाळाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

Nehruji
NDND
त्यांच्या सुरवात ते १९२२ मध्ये अलाहाबाद म्युन्सिपाल्टीचे अध्यक्ष झाले तेव्हाच झाली होती. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतीच त्यांनी अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग त्यांनी देशाच्या विकासासाठी केला.

वेबदुनिया|

स्वातंत्र्यानंतर त्यांचे व्यक्तिमत्व जगभरात झळाळून उठले. ते फक्त राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय नेता बनले. तटस्थ देशांची चळवळ त्यांच्याच नेतृत्वाखाली स्थापन झाली.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

चण्याच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या

national news
* मूतखड्याच्या समस्येत हे पाणी दिवसातून 5-7 वेळा प्यावे. * शरीरातील विषारी पदार्थ बाहेर ...

अनेक विकारांवर उपचार करणारी खडीसाखर

national news
खडीसाखर तहान भागवणारी, पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक आणि वरचेवर होणारी उलटी थांबवणारी ...

पितृदिन विशेष : बाप

national news
आईबद्दल अनेकांनी लिहिलं, देवादिकांपासून ते साहित्यिकांपर्यंत सर्वानीच आईची महती गायिली ...

योगा आणि सकारात्मक दृष्‍टी‍कोन

national news
योगसाधनेचा संबंध आपल्या शरीर व मनाशी असतो. त्यामाध्यमातून आपल्याला सरळ आत्म्याशी संवाद ...

'पद्मासन' करा आणि सेक्समध्ये एकाग्रता आणा

national news
योग आपल्या अध्यात्मिक व सेक्स जीवनात संतुलन निर्माण करण्‍याचे कार्य करत असते. 'योग' या ...