testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?

अमोल कपोले

वेबदुनिया|
नुकतेच पंख फ़ुटलेले ते पाखरू आभाळात विहरतांना स्वत:शीच म्हणाले,
स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?

त्याची नजर खाली असलेल्या एका मुलाकडे गेली,
त्याने मुलास विचारले, स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?

खपाटीला गेलेल्या पोटावरून हात फ़िरवत
मुलगा म्हणाला, दोन वेळचं पोटभर जेवण
म्हणजे स्वातंत्र्य, मित्रा.

पाखराचं समाधान झालं नाही.ते जवळच्या झाडावर जाऊन बसलं.
तोच त्याच्या शेजारी एक पाखरू येवून बसलं.
आपल्या पाखराने या दुसरया पाखराला विचारलं,
स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?

दुसरं पाखरू म्हणालं,
चल तुला दाखवतो, स्वातंत्र्य म्हणजे काय ते.

दोघेही उडाले, पेरूच्या बागेत आले.दुसर्या पाखराने एका पेरूवर झेप घेवून,
चोचीत मावेल तेवढा तुकडा तोडला,
तोच राखणदार त्यांना मारायला धावला.
चपळाईने दोघे भुर्रकन उडाले, त्याच झाडावर येऊन बसला.

दुसरं पाखरू गर्वाने हसत पहिल्याला म्हणालं,
आपल्याला हवं ते, हवं तेव्हा मिळवता येणं, म्हणजे स्वातंत्र्य.
पहिल्या पाखराला हेही उत्तर पटलं नाही.
ते पुन्हा उडालं, आणि दुसऱ्या झाडावर जाऊन बसलं.

त्या झाडाला नुकतच एक फळ आलं होतं. भुकेल्या पाखराने फळावर झेप घेतली,
ते आता खाणार इतक्यात खाली उभ्या त्या भुकेल्या मुलाकडे त्याचे लक्ष गेले,
क्षणार्धात पाखराने मुलाच्या दिशेने झेप घेतली, आणि चोचीतले फळ त्याच्या हातात टाकले.
पाखराने आता आभाळात उंच भरारी घेतली.
मोकळी हवा छातीत भरून घेतली आणि त्या
अथांग निळाईत स्वत:ला झोकून दिले.

स्वातंत्र्याचा अर्थ कुणाला विचारायची गरज आता त्याला राहिली नव्हती.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

वेट लॉसमध्ये देखील इफेक्टिव आहे हे मसाले

national news
रोजच्या जेवणात वापर करण्यात येणारे काही मसाले जेवणाची चव वाढवतात तसेच वजन कमी करण्यास ...

बनाना विथ स्पाँज केक आइसक्रीम

national news
दह्याला चांगल्या प्रकारे घुसळून घ्यावे व त्यात कुस्करलेलं केळ टाकावे. सायीला फेटून ...

जाणून घ्या बर्फाचे हे ही फायदे...

national news
उन्हाळ्यात बर्फ नाव घेतलं तरी थंड वाटू लागतं परंतू गार रसदार बर्फाचे अनेक फायदे आहे जे ...

समर हेल्थ ड्रिंक्स : स्ट्रॉबेरी फ्लोट

national news
र्वप्रथम ग्लासमध्ये स्ट्रॉबेरी क्रश घाला नंतर लिंबाचा रस आणि वेनिला आइसक्रीम घालून त्यात ...

लिंबूपाणी प्या आणि सदैव निरोगी राहा ...

national news
सदैव ताजेतवाने आणि फ्रेश राहण्यासाठी लिंबूपाण्याचे सेवन नियमित केलेले चांगले. लिंबूमध्ये ...