testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

"संसारी लोणचे"

family
संसारी लोणच्याच्या फोडी आधी करकरीत असतात
नंतर कुरकुरत का होईना हळूहळू मुरतात.
हे लोणचं बाजारात मिळत नाही
कुटुंबानं मिळून ते घाला़यचं असतं
त्याशिवाय जगण्याला चव येत नाही...

कडवट शब्दांची मेथी जरा जपूनच वापरावी
स्वत:च्या हातांनी कशाला लोणच्याची चव घालवावी ?
जीभेने तिखटपणा आवरला तर बराच फायदा होतो
लोणच्याचा झणझणीतपणा त्यांन जरा कमी होतो.
"मी" पणाची मोहरी जास्त झाली तर खार कोरडा होतो
इतरांच्या आपुलकीचा रस त्यात उगाच शोषला जातो.
रागाचा उग्र हिंग तसा तितकासा बाधत नाही
लवकर शांत झाला तर लोणच्याची चव बिघडत नाही.

प्रेमाची हळद लोणच्याला खरा रंग आणते
विकारांच्या बुरशीपासुन संरक्षण ही करते.
समृध्दीचं तेल असलं की काळजीचं कारण नसतं
त्या थराखाली लोणचं बरचसं सुरक्षित असतं...
लोणचं न मुरताच नासावं तसं काही संसारांच होतं
सहनशक्तीच्या मिठाचं प्रमाण बहुदा कमी पडलेलं असतं.... वेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता
iTunes वर देखील, डाउनलोड करण्यासाठी
येथे
क्लिक करा.
एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी
येथेक्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या
फेसबुक
आणि
ट्विटर
पानावर
फ़ॉलो करू शकता.


यावर अधिक वाचा :

अंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल

national news
अंकिता लोखंडेने नुकतेच आपल्या हॉट अंदाजाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहे. ती ...

ए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'

national news
टॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...

मी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...

national news
मी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...

2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर

national news
जगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...

'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात

national news
'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...