शनिवार, 27 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

जेव्हा मास्तरांची बायको विचारते कोण आहे ही हेमा?

husband wife jokes
मास्तरांनी हेमा नावाने नंबर जतन केला. 
मास्तरांची बायको - "अहो तुम्हाला हेमाचा फोन येतो आणि तुम्ही लगेच तयारी करुन निघून जाता...
खरं खरं सागा ही हेमा कोण ..? 
आणि केव्हाही का फोन करते...? 
म्हणजे रात्र नाही दिवस नाही. सण वार नाही...
कधीही फोन करते आणि तुम्ही गडबडीत निघून जाता... 
सवत आणताय की काय भरल्या घरात ..... 
खरं सांगा, कोण आहे ही हेमा? 
नाही तर मी जीव देईन...
मास्तर - अगं हळू बोल वेडे...'हेमा 'म्हणजे...
हेड मास्तर ...!!
बायको जागेवर बेशुध्द...