सदाशिव पेठी पुणेरी बायको आणि बिच्चारा नवरा

Last Modified सोमवार, 11 जानेवारी 2021 (12:19 IST)
बायको तणतणतपेपर वाचत असलेल्या नवऱ्याला ओरडते: "काय हो, गव्हाचे पीठ कुठून दळून आणलंत तुम्ही ?"
.
.
.
नेहमीच्या पद्धतीने नवऱ्याला बायको काय बोलतीये ते कळायला वेळ लागतोच.
थोड्या वेळाने उत्तर येते: "रोजच्याच गिरणीतून. भावे आहेत ना, गरवारे कॉलेजसमोर, त्यांच्याकडून !!!"
.
.
.
बायको: "भैय्याकडे गहू देऊन फिरायला गेले असणार ? बाजूला पानाच्या दुकानात सिगारेटी फुंकून आला असणार !!! किंवा पुढे जाऊन सह्याद्रीच्या बाजूला चंदूकडचे कांदे पोहे हादडले असणार नक्की !!!"
.
.
.
बावचळलेला नवरा : "कुठेच गेलो नव्हतो. तिथेच तर पूर्णवेळ उभा होतो." .
.
.
बायको : "लक्ष कुठे होतं मग तुमचं ? दुसऱ्या बायकांकडे बघत बसले असाल, समोरच गरवारे कॉलेज आहे, सगळ्या छबकड्या येतात कर्वे रस्त्यावर मरायला ....... आणि मला काही कळत नाही असे समजू नका !!! २७ वर्षे मी म्हणून तुमच्यासारख्या खविसा बरोबर संसार केलाय !!! दुसरी असती तर सोडून गेली असती केव्हाच !!! माझे नशीबच मेले फुटके !!! तरी आईने फडक्यांच्या त्या दिनूला विरोध केला नसता, तर आज कुठल्या कुठे असते मी, आत्ताच दिनू लंडनहून परत येऊन कॅलिफोर्निया ला गेला आहे, अजून लग्नही केले नाही बिच्च्च्चाऱ्याने !!!"

.
.
.
रडकुंडीला आलेला नवरा : "अग्गं, देवाशपथ नाही गं ! तिथेच उभा होतो मी. आणि माझे लक्षदेखील पीठावरच होतं."

.
.
.
बायको : "खोटं तर अजिब्बात बोलू नका. व्हाॅट्सऍप नाहीतर फेसबुकवर टाईमपास करत बसले असणार !!! आजकाल बघतेय् मी, तुमचं मुळी घरच्या कामात अजिबात लक्षच नसतं हल्ली !!!"


.
.
.
कावलेला नवरा : "नाही माझ्या आई ! उग्गाच बोंबलतेस कशाला ? झालंय तरी काय एवढं ??? पाया पडतो मी तुझ्या !!!"
.
.
.
बायको (अर्थातच सदाशिव पेठी पुणेरी) :
"मग सांगा बघू, चपात्या जळल्याच कशा माझ्या ???"


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

बाळासाहेब होते म्हणून आम्ही चित्रपटसृष्टीत सुरक्षितपणे काम ...

बाळासाहेब होते म्हणून आम्ही चित्रपटसृष्टीत सुरक्षितपणे काम करू शकलो : उर्मिला मातोंडकर
दिवंगत शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील शिवाजी पार्क ...

अक्षय कुमारने बच्चन पांडे यांना नवीन फोटोसह रिलीज तारखेची ...

अक्षय कुमारने बच्चन पांडे यांना नवीन फोटोसह रिलीज तारखेची माहिती दिली, जाणून घ्या केव्हा होईल रिलीज
अभिनेता अक्षय कुमारने आपल्या आगामी ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाच्या रिलीज तारखेविषयी ...

ट्रिप मॅनेजर पुण्याचा होता

ट्रिप मॅनेजर पुण्याचा होता
अंदमानला सहलीला जाताना पर्यटकांच्या दोन रांगा लागल्या होत्या. एक ट्रीप होती सिनियर ...

तुम्ही हे केलंय का..??

तुम्ही हे केलंय का..??
कितीही मोठे झालात तरी बापाला कधी मिठी मारली का..? नसेल मारली तर नक्की मारा.. बघा बापाला ...

निसर्गांनं नटलेलं केरळ

निसर्गांनं नटलेलं केरळ
केरळला निसर्गाचे वरदान आहे. सुवासिक मसल्यांसाठी प्रसिद्ध असणारे केरळ आपल्या सौदर्याचीही ...