testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात

valentine day
Last Modified गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (13:48 IST)
शाळेत असताना मीही एकदा
पडलो होतो प्रेमात,
कळलच नाही,'काय बघीतलं होतं
कुलकर्ण्यांच्या हेमात?'

कुलकर्ण्यांची हेमा म्हणजे
शंभर नंबरी सोनं,
नाकावरती सोडावॉटर आणि
मागे दोन वेण्या .

वारं आलं तर ऊडून जाईल
अशी तीची काया,
रुपं पक्क काकूबाई...
पण अभ्यासावर माया

गॅदरींगमध्ये एकदां तिने
गायलं होतं गाणं,
तेव्हापासून तिच्या घरी
वाढलं येणं जाणं.

नारळीपौर्णीमेला तिन मला
नारळीभात वाढला,
हातात तिच्या राखी बघून
मीच पळ काढला

नको त्या वयात प्रेम करायची
माझी मस्ती जीरून गेली,
शाळेमधली प्रेम-कहाणी
शाळेमध्येच विरुन गेली.

थोड्याच दिवसात वेगळं व्हायची
वेळ आमच्यावर आली होती,
मित्रांकडून कळलं, हेमाच्या
वडीलांची बदली झाली होती

पुलाखालून दरम्यानच्या काळात
बरचं पाणी वाहून गेलं
पुढ हेमाचं काय झालं ?
हे विचारायचच राहून गेलं

परवाच मला बाजारात
अचानक हेमा दिसली
ओळखलचं नाही मी ....
म्हटल्यावर खुदकन गालात हसली.

आईशप्पथ सांगतो तुम्हाला तिच्यात
काय सॉलीड बदल झाला होता,
चवळीच्या शेंगेला जणू
आंब्याचा मोहोर आला होता

लग्नानंतर हेमा पाच वर्षात
गरगरीत भरली होती
मागे उभ्या नवर्‍याने हातात
भाजीची पिशवी धरली होती

सोडावॉटर जाऊन आता
कॉन्टॅक्ट लेन्स आले होते,
कडेवर एक आणि हातामध्ये एक
असे दोन प्रिन्स झाले होते.

मंगळसुत्र मिरवत म्हणाली,
"हे आमचे हे"
बराच वेळ हात अवघडला
जरा भाच्याला घे,

बरं झालं बरोबर मी माझ्या
बायकोला नेलं होतं
माझ्या प्रेयसीनं नवर्‍यासमोर
मलाच मामा केलं होतं
म्हणून आयुष्यात माणसाने कधी
चुकू नये नेमात
शाळेत असताना मीही एकदा
पडलो होतो प्रेमात


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

अजय देवगणचा हा चित्रपट का झाला बंद?

national news
अजय देवगण हा खूप बिझी कलाकार आहे. त्याचा टोटल धमाल हा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. ...

बॉलीवूडने नाकारले पाकिस्तानी कलाकार, आता येथे काम मिळणे ...

national news
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (एआयसीडब्ल्यूए) ने पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी ...

सोनमनं सोशल मीडियावर बदललं आपलं नाव

national news
बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर नेहमीच आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत असते. आतादेखील तिने ...

वन लाइनर मराठी जोक्स

national news
जेव्हा तुमच्या अंतरात्म्याचा आवाज तुम्हाला सोडून सगळ्यांना ऐकू जातो त्याला घोरणे

मराठी मुलीच्या गालावर हात फिरवल्यास...

national news
तरुण मुलीच्या गालावरुन गुलाबाचे फुल फिरवल्यास... इंग्रजी मुलगी: यु आर नॉटी ...