Widgets Magazine

लाल शर्ट- पिवळी पॅंट

joke
डॉन आपल्या जहाजावर फेर्‍या मारत होता.
एक मुलगा धावत त्याच्याजवळ आला आणि म्हणाला,
"भाई.......शत्रुचे एक जहाज आपल्या दिशेने येत आहे."
डॉन शांतपणे म्हणाला "जा आणि माझा लाल शर्ट घेऊन ये "
नंतर शत्रुच्या जहाजा बरोबर जोरदार युद्ध झालं.
बंदुकीच्या जोरदार फैरी झाडल्या गेल्या आणि अखेरीस डॉन जहाज जिंकले.
मुलगा डॉन जवळ आला आणि म्हणाला ,
" अभिनंदन भाई .....पण लाल शर्ट कशासाठी ? "
" जर मी जखमी झालो तर, माझ्या शरीरावर रक्ताचे डाग बघुन माझ्या माणसाचा धीर खचेल आणि ते जिंकण्याची आशा सोडून देतील. रक्ताचे डाग दिसू नयेत म्हणून लाल शर्ट !
त्यानंतर थोड्याच वेळात तोच मुलगा धावत आला आणि म्हणाला,
" भाई....शत्रुची वीस जहाजे आपल्या जहाजाच्या दिशेने येत आहेत !"
डॉन थोडावेळ शांत उभा राहीला आणि म्हणाला,
" जा........ आणि माझी पिवळी पॅंट घेऊन ये "


यावर अधिक वाचा :